धक्कादायक! पोलिओची लस दिल्यानंतर सात महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू; पालघर जिल्ह्यातील घटना
आदिवासी कुटुंबियातील सात महिन्यांच्या बाळाला पोलिओची लस दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र कोरोना संकटाशी झुंज देत असताना पालघर (Palghar) जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आदिवासी कुटुंबियातील सात महिन्यांच्या बाळाला पोलिओची लस दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील मोकाडा (Mokada) तालुक्यात बुधवारी घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी बाळाला पोलिओचा डोस (Polio Vaccine) देण्यात आला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्यानंतर त्याच्या मृत्यू झाला असल्याचे त्याच्या पालकांना कळाले. याप्रकरणी मोकाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मोकाडा तालुक्यात आदिवासी कुटुंबातील सात महिन्यांच्या बाळाचा लस लागल्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. मंगळवारी दुपारी बाळाला पोलिओच्या थेंबाचा एक डोस देण्यात आला आणि त्याच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, दुसर्या दिवशी सकाळी तो उठला नाही, असे मोकाडा पोलिस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसने सांगितले.यासंदर्भात अपघाती मृत्यूचा नोंद करण्यात आली आहे. तसेच बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती मिळत आहे. हे देखील वाचा- नाशिक: रुग्णवाहिकेतून पळून जाण्याच्या प्रयत्नात एका कोरोना संशयिताचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
पीटीआयचे ट्विट-
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट वावरत असताना पालघर जिल्ह्यातील घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 150 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.