जेष्ठ पत्रकार विकास काटदरे यांचे निधन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले शोकाकूल
ज्येष्ठ शिवसैनिक, पत्रकार व सामनाचे वार्ताहार विकास काटदरे (Vikas Katdare) यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अत्यंत शिस्तप्रिय व जागरूक पत्रकाराला गमावला आहे. विकास काटदरे यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून धक्का बसला आहे.
ज्येष्ठ शिवसैनिक, पत्रकार व सामनाचे वार्ताहार विकास काटदरे (Vikas Katdare) यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अत्यंत शिस्तप्रिय व जागरूक पत्रकाराला गमावला आहे. विकास काटदरे यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शोकाकुल झाले आहेत. डोंबिवलीचे जुने जाणते, अभ्यासू पत्रकार विकास काटदरे यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख झाले. सामना, मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी एकीकडे पत्रकारितेचे व्रत जोपासले तर दुसरीकडे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांवर संस्कार केले. एक अभ्यासू व संवेदनशील पत्रकार आपण सर्वांनी गमावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्वीट-
डोंबिवलीचे जुने जाणते, अभ्यासू पत्रकार विकास काटदरे यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून दुःख झाले. सामना, मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी एकीकडे पत्रकारितेचे व्रत जोपासले तर दुसरीकडे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांवर संस्कार केले. एक अभ्यासू व संवेदनशील पत्रकार आपण सर्वांनी गमावला आहे.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 7, 2020
उद्योगात धडाडी आणि सामाजिक क्षेत्रात बांधिलकी जोपासणारा संवेदनशील उद्योजक महाराष्ट्राने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इचलकरंजीच्या फाय समुहाचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष पंडितराव कुलकर्णी यांनाही श्रद्धांजली वाहिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2020 12:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

