Maharashtra Election 2024 Campaign: विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान सीमा हिरे आणि VBA उमेदवार अविनाश शिंदे वेगवेगळ्या अपघातात जखमी

प्राप्त माहितीनुसार, देवळाली मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अविनाश शिंदे (Avinash Shinde) यांना रात्री उशिरा अज्ञात वाहनाने मागून धडक दिली.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Election 2024 Campaign: आज विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा (Maharashtra Election 2024 Campaign) शेवटचा दिवस होता. सर्व राजकीय पक्षाच्या प्रचारच्या तोफा आज थंडावल्या आहेत. अशातचं आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणारे दोन उमेदवार सोमवारी प्रचारादरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, देवळाली मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अविनाश शिंदे (Avinash Shinde) यांना रात्री उशिरा अज्ञात वाहनाने मागून धडक दिली.

या धडकेने मागील खिडकीचा चक्काचूर झाला आणि चालकाच्या शेजारी बसलेले डॉ. शिंदे यांच्या मानेला, डोक्याला आणि छातीला दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर उपनगर पोलीस घटनेचा तपास करत असून अपघातात सहभागी असलेल्या वाहनाची ओळख पटविण्याचे काम करत आहेत. (हेही वाचा -Jalgaon Firing: धक्कादायक! अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; जळगाव शहरातील घटना; विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस)

महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांचा अपघात -

याशिवाय, रविवारी सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये प्रचार करताना पश्चिम मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांचा अपघात झाला. प्रचाराचे फलक झाडाच्या फांदीवर अडकल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. या अपघातात हिरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या चार महिलांना किरकोळ दुखापत झाली. तथापि, प्रथमोपचार मिळाल्यानंतर, हिरे यांनी मतदारांशी संलग्न राहण्याचा निर्धार दाखवून त्वरीत प्रचाराची कामे पुन्हा सुरू केली.

दरम्यान, नाशिकमध्ये सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सिद्धार्थ नगर येथे घराबाहेर उभ्या असलेल्या कुटुंबीयांवर भरधाव कार गेल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. चंदाबाई साहेबराव कापसे असं मृत महिलेचं नाव आहे.