हरियाणा विधानसभा निवडणूक 2019: भूपेंद्र सिंह हुड्डा, दुष्यंत चौटाला, मनोहर लाल खट्टर यांच्यासह पहा 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

हरियाणा विधानसभा गेल्या वर्षी निवडणुकीत 76.54 टक्के मतदान झाले होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 47 जागेवर विजय मिळवला होता.

हरियाणात 2014 च्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. हरियाणा विधानसभा गेल्या वर्षी निवडणुकीत 76.54 टक्के मतदान झाले होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 47 जागेवर विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाला 15 जागा मिळाल्या होत्या. त्याचबरोबर इंडियन नॅशनल लोकदलला 19 जागा मिळाल्या होत्या तर, बहुजन समाज पार्टीला केवळ 1 जागा मिळाली होती. तसेच त्यावेळी 5 अपक्षही निवडणूक लढवत होते.

हरियाणा विधानसभा मतदारसंघात गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरुच आहे. गेल्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली होती. एक्झिट पोलनुसार या निवडणुकतही भाजपचा विजय होणार, अशी अपेक्षा केली जात आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला भाजप आणि विरोधी पक्षात मोठी टक्कर पाहायला मिळाली होती. दरम्यान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी सकाळी एका मतदारसंघात भेट देऊन काँग्रेसचा बहुमताने विजय होईल, असे विधान केले होते. हरियाणा राज्यात मतमोजणी होण्याअगोदर काँग्रेसला जेजेपी पासून कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे रणदीप सुरजेला म्हणाले होते. हे देखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: दीड लाखांपेक्षा मतांनी अजित पवार झाले विजय, जाणून घ्या राज्यात अधिक मतांनी विजयी होणार उमेदवार

हरियाणा मतदारसंघातील विजयी उमेदवार-

सध्या हरियाणात राज्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. हरियाणा विधानसभा निवडणुक पार पडण्याअगोदर भारतीय जनतापक्षाने अब की बार 75 पार अशी घोषणा दिली होती. परंतु, भाजपला बहुमतही मिळवता आले नाही. हरियाणा राज्यात बहुमत मिळवण्यासाठी 46 जागांवर विजय मिळवणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील 90 जागांवर भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार लढत होत आहे. सध्या भाजपने 33 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेस पक्षाला 28 जागेवर विजय मिळवता आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif