Pune Schools Reopening Date: पुण्यातील शाळा 23 नोव्हेंबरला नव्हेतर 'या' दिवशी उघडली जाणार; महापौर मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट

मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांवरील कोरोनाचे सावट अजूनही कमी झालेले नाही. राज्यात अनलॉकच्या अंतर्गत जनजीवन पूर्वपदावर येत असून, रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

Schools in Pune City to Remain Closed: महाराष्ट्रात येत्या सोमवारपासून (23 नोव्हेंबर) नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांवरील कोरोनाचे सावट अजूनही कमी झालेले नाही. राज्यात अनलॉकच्या अंतर्गत जनजीवन पूर्वपदावर येत असून, रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका वाढला असून, दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत, असा आदेश पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिला आहे. एवढेच नव्हेतर, 13 डिसेंबरला पुण्यातली कोरोनाची स्थिती पाहिल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या अटोक्यात येत असताना राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकार संभ्रमावस्थेत आहे. यातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील शाळांबाबत महत्वाचे ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, पुण्यातील शाळा बंदच ठेवणार! पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला असून येत्या 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. पालकांशी चर्चा करुन आणि कोरोना संसर्ग स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे, असे महापौर म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Schools Reopen in Maharashtra: राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांना कोरोनाची लागण, शाळा सुरु करण्याबद्दल प्रश्नचिन्ह

मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट-

पुणे शहरात आज एकाच दिवसात 4 हजार 396 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 7 लाख 85 हजार 776 इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या 4 हजार 821 रुग्णांपैकी 395 रुग्ण गंभीर असून यातील 247 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, 148 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 4 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 4 हजार 421 इतकी झाली आहे. शहरातील 246 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 1 लाख 57 हजार 410 झाली आहे, अशीही माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif