IPL Auction 2025 Live

विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम 10 टक्के कमी होणार : प्रकाश जावडेकर

शालेय विद्यार्थ्यांचा वाढता अभ्यासक्रम पाहून तो कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

शालेय विद्यार्थ्यांचा वाढता अभ्यासक्रम पाहून तो कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी सांगितले. तसेच अभ्यासक्रमात 10 टक्के कमी करणार असल्याचा ही निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या वर्षात अभ्यासक्रम टप्याटप्याने कमी करण्यात येणार आहे. तसेच पुढच्या वर्षात 20 टक्के अभ्यासक्रम कमी केला जाणार आहे. तर पहिली आणि दुसरीचा घरचा अभ्यासही बंद केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा साहित्यिक आणि खेळामध्ये सहभाग वाढण्यास मदत होईल म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली.

विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके ही कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी फक्त अभ्यासात अडकून न राहता प्रात्यक्षिक खेळाकडे ही त्यांचा कल वाढण्यास मदत होणार आहे.