Scholarship Examination in Maharashtra: इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेबाबत संभ्रम दूर, परीक्षा परिषदेचा महत्त्वाचा निर्णय

यंदा ही परीक्षा कधी होणार याबाबतही उत्सुकता होती. अखेर या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. ही परीक्षा येत्या जून महिन्यात पर पडणार आहे.

Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकडे ( Class V, VIII Scholarship Examination) पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह अवघ्या शैक्षणीक वर्तुळाचे लक्ष असते. यंदा ही परीक्षा कधी होणार याबाबतही उत्सुकता होती. अखेर या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. ही परीक्षा येत्या जून महिन्यात पर पडणार आहे. अद्याप तारीख जाहीर झाली नाही. मात्र, ही परीक्षा कधी होऊ शकते याबाबत सूत्रांनी ठोस माहिती दिली आहे. परीक्षा परिषदेकडूनही याबाबत माहिती देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अद्याप अर्ज दाखल केलेल नसतील त्यांनाही अर्ज दाखल करण्यासाठी संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

कोरोनापूर्वी प्रत्येक वर्षी ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतली जात असे. मात्र कोरोनामुळे शैक्षणीक वर्तुलातील नियोजनच कोसळून पडले. यंदाही ही परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी घेतली जाणार होती. त्यानुसार प्रशासणाने तशी तयारीही केली होती. डिसेंबर महिन्यात परीक्षेसाठी इच्छुकांचे अर्जही दाखल करुन घेण्यास सुरुवात झाली होती. मात्र, या काळात अनेक शाळा बंदच होत्या. त्यामुळे अर्ज दाखल न केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी मिळाली नाही त्यांना अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेचे नियोजन विस्कळीत झाले. परिणामी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. (हेही वाचा, MPSC Group C Admit Card 2022 जारी; mpsconline.gov.in वरून डाऊनलोड करा हॉल तिकीट)

दरम्यान, संबंधीत विभागाने परीक्षा घेण्याबाबत सूचना दिली आहे. याबाबत लवकरच सुधारीत माहिती प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार पुढील तारीख जाहीर होईल. दरम्यान, राज्यभरातून इयत्ता पाचवीसाठी 4,10,395 आणि आठवीसाठी 2,99, 255 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती आहे.