OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचाव जनसंपर्क अभियानाची जळगावपासून सुरुवात, अनिल महाजन यांची माहिती

ओबीसी आरक्षण बचाव (Save OBC Reservation Campaign) जनसंपर्क अभियान जळगाव जिल्ह्यातून सुरु केले जाणार आहे. हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करणयात आला आहे. या अभियानासंदर्भात 16 ऑगस्ट 2021 या दिवशी दुपारी ओबीसी ((Save OBC Reservation) महाबैठक-मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बैठक-मेळाव्यास अनिल महाजन (Anil Mahajan) यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाभरातील सर्व ओबीसी- बहुजन समाजातील समाज बांधव ह्या महाबैठक मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

Anil Mahajan | (Photo Credits- File Photo)

ओबीसी आरक्षण बचाव (Save OBC Reservation Campaign) जनसंपर्क अभियान जळगाव जिल्ह्यातून सुरु केले जाणार आहे. हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करणयात आला आहे. या अभियानासंदर्भात 16 ऑगस्ट 2021 या दिवशी दुपारी ओबीसी (Save OBC Reservation) महाबैठक-मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी  माहिती अनिल महाजन (Anil Mahajan)  यांनी दिली आहे.  या मेळाव्यास जिल्हाभरातील सर्व ओबीसी- बहुजन समाजातील समाज बांधव ह्या महाबैठक मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राजीव गांधी टाऊन हॉल, दुसरा मजला , मानसिंगका कॉर्नर, शिवाजी चौक, पाचोरा –४२४२०१ येथे उपस्थित राहावे असे अवाहनही महाजन यांच्याकडून करण्यात आले आहे.

अभियानासंदर्भात माहिती देताना अनिल महाजन यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने रद्द केलेले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा आबाधित करा या मागणीसाठी सर्वपक्षीय ओबीसी समाजातील प्रमुख लोक पाचोरा येथे मेळावा मध्ये एकत्र येऊन विचारविनिमय करून पुढील दिशा ठरवणार आहेत. ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान ओबीसींच्या हितासाठी ओबीसी समाजाच्या अनेक राजकीय आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्याच काम करणार आहे. सदर महाबैठक- मेळावा हा सर्व ओबीसी बहुजनांसाठी आहे. कोणीही निमंत्रणाची वाट पाहू नये आपल्या हक्कासाठी आपल्या अस्तित्वासाठी जिल्हाभरातून सर्व ओबीसी समाज बांधवांनी एकत्र यावे हीच ती वेळ आपले संघटन कौशल्य दाखविण्याची आहे. आता नाही तर कधीच नाही आपली पुढील पिढीला भविष्य उरणार नाही. जळगाव जिल्ह्यातील सर्व राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या ओबीसी राजकीय आरक्षण बचाव महाबैठक मेळाव्याला उपस्थित राहावेअसे आव्हान ओबीसी नेते व ए.एम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना केले आहे.

अठरापगड जाती,बाराबलुतेदार,आलुतेदार समाजावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे. त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील शिष्यवृत्तीचा विषय असेल प्रत्येक ठिकाणी यांना संघर्ष करावा लागतो. ओबीसी समाजातील माळी, धनगर वंजारी ,तेली ,तांबोळी,धोबी, परीट, सोनार, कुणबी ओबीसी मधील सर्व मुख्य घटकाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. राज्यभरात ओबीसी समाजाच्या अनेक लहान मोठ्या संघटना आपापल्या परीने ओबीसी चे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. ओबीसी समाजाला देशाचे नेते शरद पवार यांनीच मंडल आयोग लागू करून आरक्षण मिळवून दिले आहे. आता सुद्धा पवार ओबीसीचे रद्द झालेल्या राजकीय आरक्षण शरद पवार मिळवून देतील यात काही शंका नाही. यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहेत, असेही अनिल महाजन यांनी म्हटले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now