Coronavirus: पती मायदेशी परतल्याने 'साता-याची महिला' वुहानमध्ये अडकली; भारत सरकारकडे केली मदतीची मागणी

तिचा पती तिला तिथे एकटे सोडून आपल्या मायदेशी पोलंड शहरात एकटाच परतला. अश्विनी पाटील असं या विवाहितेचं नाव आहे.

Coronavirus (Photo Credits: IANS)

चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांची संख्या काही कमी नाही. यात अन्य देशातून आलेले नागरिकही वुहान शहरात अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी त्या त्या देशाची सरकार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यात भारत सरकारनेही मागील आठवड्यात विमान पाठवून तेथील 700 भारतीयांना भारतात परत आणले. मात्र अजूनही बरेच भारतीय वुहान मध्ये अडकले आहेत. त्यात साता-यातील एका महिलेने सोशल मिडियावर आपला एक व्हिडिओ शेअर करुन भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. तिचा पती तिला तिथे एकटे सोडून आपल्या मायदेशी पोलंड शहरात एकटाच परतला. अश्विनी पाटील असं या विवाहितेचं नाव आहे.

मागील आठ महिन्यांपासून अश्विनी आणि तिचा पती चीनच्या वुहान शहरात रहात होते. या दरम्यान अश्विनीने व्हिसाच्या कामासाठी पासपोर्ट दिला होता. मात्र तो परत येण्याआधीच वुहान शहर शटडाऊन करण्यात आलं. त्यामुळे अश्विनीचा पासपोर्ट तिला मिळू शकला नाही. याच दरम्यान अश्विनीचा पती आजारी झाला. तिचा पती पोलंडचा आहे. त्याने मायदेशी येऊन उपचार मिळावेत ही विनंती पोलंड सरकारला केली. पोलंड सरकारने विशेष विमान पाठवून अश्विनीच्या पतीलाच मायदेशी नेलं. पासपोर्ट नसल्याने अश्विनीवर वुहानमध्येच अडकून पडण्याची वेळ आली आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus: चीनमध्ये कोरोना व्हायरस ने घेतला 1000 च्या वर लोकांचा बळी; तर 40,000 हून अधिक या गंभीर आजाराच्या विळख्यात

पाहा व्हिडिओ:

त्यामुळे आपल्याला ही येथून लवकरात लवकर आपल्या मायदेशी आपल्य बारतात परत घेऊन जावे अशी मागणी करणारा व्हिडिओ अश्विनी ने शेअर केला आहे.

आपल्यासारखे अजून 70 ते 80 भारतीय येथे अडकून पडले आहेत असेही तिने या व्हिडिओत म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही अश्विनीशी संवाद साधला आहे. तिला मदतीचं आश्वासन दिलं आहे असंही समजतं आहे.