Satara Crime: प्रेयसीसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून मित्राची निर्घृण हत्या, सातारा येथील घटना
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याजवळील एकाने त्याची प्रेयसीचे मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मित्राची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.
Satara Crime: प्रेम संबंधाच्या संशयावरून अनेकांनी टोकाचे पाऊल उचलले असून, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याजवळील एकाने त्याची प्रेयसीचे मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मित्राची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. मित्राचा कोयत्याने वार करून खून केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपीला अटक करण्यात आला आहे. सोमवारी एका पोलिस अधिकाऱ्यांने अशी माहिती माध्यमांना दिली. (हेही वाचा- बदला घेण्याच्या वृत्तीने दोन चिमुकल्या भांवडांची हत्या, बीड हादरलं)
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय विष्णू शिंदे असं आरोपीचे नाव आहे. नामदेव प्रल्हाद शिंगे असं मृत तरुणाचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आले आहे. १८ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नामदेव आणि त्याची प्रेयसी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय अक्षयने घेतला. दोघांमध्ये सुरुवातीला वाद झाला आणि त्यानंतर मारमाराती अक्षयने नामदेववर कोयत्याने सपासप वार केला.
सातारा येथील कराड भागातील चिंचणी-वांगी पोलिसांनी तपास सुरू करून शनिवारी रात्री अक्षय शिंदेला अटक केली. कडेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथक अधिक चौकशी करत आहे. पीडित महिला 30 वर्षीय नरसिंगपूर, वाळवा येथील रहिवासी होती. या घटनेनंतर संपुर्ण गावात एकच खळबळ उडाली आह.