Saroj Ahire Supports Ajit Pawar: अजित पवारांचे नाशिक मध्ये स्वागत करायला पोहचत सरोज अहिरे यांनी जाहीर केली भूमिका
जनतेचा कौल अजित पवारांच्या बाजूने आहे. मी जनतेची सेवक म्हणून अजित पवारांना जाहीर पाठिंबा देत आहे.” असं म्हणाल्या.
नाशिक (Nashik) मध्ये आज 'शासन आपल्या दारी 'च्या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागताला पोहचत आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी देखील आपला पाठिंबा अजित पवार यांना असल्याचं जाहीर केले आहे. एनसीपीच्या फूटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत कोण आणि किती आमदार असणार याची स्पष्टता येत नव्हती. अनेकांची द्विधा मनस्थिती झाली होती. पण . 'शरद पवार हे वडिलांसारखे असून अजितदादा भावासारखे आहेत', असं म्हणत आमदार सरोज अहिरे यांनी निर्णय जाहीर केला आहे. सरोज अहिरे या आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या त्यामुळे त्यांची भूमिका मेळाव्यात अस्पष्ट होती पण आज त्या अजित पवारांच्या स्वागताला आल्या आणि आपला त्यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.
सरोज अहिरे या नाशिक मधिल देवळाली च्या आमदार आहेत. सरोज अहिरे हॉस्पिटलमध्ये असताना सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली होती. आज प्रोटोकॉल नुसार, सरोज अहिरे नाशिक स्टेशनला पोहचल्या होत्या तेव्हा माध्यमांशी बोलताना “माझा निर्णय झालेला आहे. जनतेचा कौल अजित पवारांच्या बाजूने आहे. मी जनतेची सेवक म्हणून अजित पवारांना जाहीर पाठिंबा देत आहे.” असं म्हणाल्या. नक्की वाचा: Sharad Pawar Faction: शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीसा, घ्या जाणून .
अजित पवार यांच्या बंडानंतर आज उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार नाशिक मध्ये दाखल झाले आहेत. वंदे भारत ट्रेनने प्रवास करत ते आज नाशिक मध्ये झाले आहेत. अनेक प्रवाशांनी अजित पवारांची ट्रेनमध्ये भेट घेतली आहे. नाशिक मध्येही अजित पवारांचे जंगी स्वागत झाले आहे.