शिवसेना आमदार संतोष बांगर यांची शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी
सध्या शिवसेना पक्षामधील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून विविध शिवसेना शाखांना भेट देऊन शिवसैनिकांसोबत संपर्क वाढवत आहेत, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत तर उद्धव ठाकरे देखील स्वतः सेनाभवनात दाखल होऊन विविध बैठका घेऊन जिला अध्यक्ष, संंपर्कप्रमुख यांच्याशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाविकास आघाडी मधून बाहेर पडण्यासाठी शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली काही अपक्षांच्या मदतीने त्यांनी विधिमंडळातील शिवसेनेत फूट पाडली आहे. सध्या शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांविरूद्ध अपात्रतेची कारवाई न्यायप्रविष्ट असताना पक्षात मात्र त्यांच्याविरूद्धच्या कारवाईला सुरूवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांची शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. हे देखील नक्की वाचा: Tanaji Sawant: उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांना धक्का, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन उचलबांगडी .
संतोष बांगर हे बंडखोरी करत शिंदे गटामध्ये सहभागी झालेल्या आमदारांपैकी शेवटच्या आमदारांपैकी एक आहेत. विधिमंडळाच्या 2 दिवसीय विशेष अधिवेशनादरम्यान पहिल्या दिवशी अध्यक्ष निवडीला बांगर शिवसेनेसोबत होते मात्र दुसर्या दिवशी बहुमत चाचणीच्या मतदानाला त्यांनी शिंदे गटात सहभागी होत महाविकास आघाडी विरूद्ध मतदान केले. नक्की वाचा: Maharashtra Politics : शिंदे सरकारच्या भवितव्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी .
दरम्यान संतोष बांगर यांनी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं वारंवार सांगितलं होते. त्यांनी मराठवाड्यात रस्त्यावर उतरून बंडखोरांचा निषेध केला होता. ढसाढसा रडत शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचं आवाहन देखील केले होते मात्र काही तासांतच चित्र पालटलं आणि बांगर देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले.
सध्या शिवसेना पक्षामधील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून विविध शिवसेना शाखांना भेट देऊन शिवसैनिकांसोबत संपर्क वाढवत आहेत, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत तर उद्धव ठाकरे देखील स्वतः सेनाभवनात दाखल होऊन विविध बैठका घेऊन जिला अध्यक्ष, संंपर्कप्रमुख यांच्याशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची निशाणी 'धनुष्य बाण' सेनेकडेच राहील इतर चिन्हांचा विचार करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.