Sanjay Shirsat On Sushma Andhare: माझ्यात असलेल्या हिम्मतीच्या जोरावर मी कधी लाचार होणार नाही, आमदार संजय शिरसाट यांचं सुष्मा अंधारेंना प्रत्युत्तर

संजय शिरसाट यांनी सुष्मा ताई असा उल्लेख करत भावाबद्दल चांगलं वक्तव्य केलं त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभार मानले आहेत.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या नाराजीबाबत सतत चर्चा होत असतात. तरी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. संजय शिरसाट यांना खूप पश्चाताप होत असून ठाकरे गटाला अजूनही बंडखोरांच्या परतीची अपेक्षा असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सुषमा अंधारेंच्या दाव्याला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिल आहे. तर सुषमा अंधारेंचा गैरसमज झाला असून मी शिंदे गटासोबतचं आहे, माझ्यात हिंम्मत आहे आणि हिम्मतीच्या जोरावर मी कधीही लाचारी पत्कारनार नाही, असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी सुष्मा अंधारे यांना दिलं आहे.

 

संजय शिरसाट आणि सुष्मा अंधारे एकमेकांना बरेच दिवसांपासून ओळखतात. त्यामुळे संजय शिरसाट यांनी सुष्मा ताई असा उल्लेख करत भावाबद्दल चांगलं वक्तव्य केलं त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभार मानले आहेत. कुणीतरी माझी काळजी करणारं आहे हे ऐकून मला बरं वाटलं, असा मिश्कील टोला सुष्मा अंधारेंना संजय शिरसाटांना लगावला आहे. तसेच मी नाराज नाही. याबाबत अनेक वेळा मी बोललोय. सध्या माझ्या नाराजीचं काही कारणच नाहीये”, असं संजय शिरसाट माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. (हे ही वाचा:- Kartiki Ekadashi: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक शासकीय कार्तिकी एकादशी महापूजा संपन्न)

 

जी भुमिका मी ठामपणे घेतली त्याबाबत पश्चाताप होण्यासारखं काही कारण नाही असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी माध्यमांना दिलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतात हे आम्हाला माहिती आहे म्हणून कुणीही नाराज किंवा अस्वस्थ असल्याचा प्रश्नचं नाही असं म्हणत संजय शिरसाट यांनी सुष्मा अंधारेंचा दावा खोडून काढला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement