शिवसेनेचा भाजपावर पलटवार,'पोकळ धमक्यांना घाबरत नाही'- संजय राऊत
लातूर येथे रविवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीवरून शिवसेनेवर निशाणा साधला होता.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सार्याच पक्षांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सध्या भाजपा (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरूआहेत. आगामी लोकसभेत शिवसेना भाजपासोबत जाणार की नाही? यावर आता सार्यांचे लक्ष लागले आहे. सध्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्र दौर्यावर आहेत. ‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’असा इशारा अमित शहा यांनी दिला होता त्यावर आता शिवसेनेने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
शिवसेना पोकळ धमक्या आणि पाद्रया पावट्यांच्या इशाऱ्यांना कधीच घाबरली नाही. शिवसेनेचे काळीज वाघाचे आहे. अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच ‘पटकवले’ आहे, इतक्या लवकर हे विसरलात का? असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
लातूर येथे रविवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीवरून शिवसेनेवर निशाणा साधला होता.