Sanjay Raut आणि Aaditya Thackeray यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्याची प्रक्रिया सुरू- शिंदे गटाकडून माहिती

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी असंसदीय शब्दांचा वापर केल्याचा सांगत शिंदे गट त्यांच्याविरूद्ध हक्कभंग प्रस्ताव आणणार आहेत.

AUT and Sanjay Raut | Twitter

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये काल विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला आहे. विधिमंडळात बहुमताच्या जोरावर शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंचाच असा त्यांनी निकाल देताना त्यांच्याच भरत गोगावलेंचा व्हिप वैध ठरवला आहे. मात्र कोणत्याच आमदारांना अपात्र ठरवले नाही. सुमारे 2 तासंच्या निकाल वाचनानंतर संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना वापरलेल्या काही शब्दांवर शिंदे गटाने आक्षेप नोंदवला आहे.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी असंसदीय शब्दांचा वापर केल्याचा सांगत शिंदे गट त्यांच्याविरूद्ध हक्कभंग प्रस्ताव आणणार आहेत. आज शंभूराजे देसाई यांनी त्याची माहिती देताना कारवाई सुरू केल्याचं म्हटलं आहे. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.Sanjay Raut यांच्या विरोधात Privilege Motion Notice; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र .

संजय राऊत यांनी काल निकालापूर्वी आणि नंतरदेखील राहुल नार्वेकरांचा निकाल हा मॅच फिक्सिंग असल्याचा दावा केला आहे. दरम्यान शंभूराजेंनी हे मॅचफिक्सिंग असतं तर पक्षपातीपणा करत विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र ठरवले असते असे म्हटलं आहे.

पहा संजय राऊतांची प्रतिक्रिया

पहा आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्षांनी आपण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीचं पालन करून आपण निकाल दिला असल्याचं म्हटलं आहे. नार्वेकरांनी याचिकांचे 6 गटात विभाजन करून सारे निकाल सुनावले आहेत. आता ठाकरे गट या निकालाला पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif