Sangli Water News: सांगली, कुपवाडा शहरात पाणीसंकट, कोयना धरणातून पाण्याची मागणी
सांगली, कुपवाड शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळ आठवडाभर पाणी उपसा होईल इतका पाणी साठा आहे.
राज्यात यंदा पावसाने उशीरा हजेरी लावली होती त्यानंतर जुलै महिन्यात काही दिवस पाऊस झाल्यानंतर पुन्हा ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे राज्यातील अनेक शहरात सध्या भीषण पाणीटंचाई पहायला मिळत आहे. सांगलीजवळ कृष्णा नदीचे (Krishna River) पात्र पुन्हा कोरडे पडू लागले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये कृष्णा नदीचे हे असे कोरडे पात्र सांगलीकर (Sangli) बऱ्याच वर्षांनी पाहत आहेत. सध्या आयर्विन पुलाच्या (Irwin Bridge Sangli) खालचे कृष्णा नदीचे कोरडे पात्र दिसू लागले आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा यलो अलर्ट, मुंबईत पुढील 48 तास असं राहील वातावरण)
सांगली, कुपवाड शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळ आठवडाभर पाणी उपसा होईल इतका पाणी साठा आहे. आठवड्याभरात मात्र पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर मात्र कृष्णा नदीत कोयनेतून विसर्ग करण्याची गरज लागू शकते. पावसाने अशीच ओढ घेतली तर शहरात पाणी टंचाईचे संकट आणखी वाढण्याची शक्यता देखील आहे.
गणपतीचे आगमन-विसर्जन होणार असल्याने मोठा पाऊस पडला नाही तर गणपती विसर्जनासाठीचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. दरम्यान महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाला कोयना धरणातून नदीत पाणी सोडण्याबाबत विनंती केली आहे.