Sangli News: कपडे उतरवले, अंतर्वस्त्रेही उलटी परीधान करण्यास सांगितली, नीट परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी सांगली येथे धक्कादायक प्रकार

प्रशासनाने कॉपी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची तपासणी केली. या वेळी विद्यार्थ्यांना कपडे उतरविण्यास भाग पाडले. तसेच, त्यांची अतरवस्त्रे उतरवून ती उलटी परीधान करण्यासही सांगण्यात आल्याचा आरोप होतो आहे.

Sangli News: कपडे उतरवले, अंतर्वस्त्रेही उलटी परीधान करण्यास सांगितली, नीट परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी सांगली येथे धक्कादायक प्रकार
Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

सांगली (Sangli News) येथे नीट (Neet Exam) परीक्षेदरम्यान, परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत असभ्य वर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. प्रशासनाने कॉपी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची तपासणी केली. या वेळी विद्यार्थ्यांना कपडे उतरविण्यास भाग पाडले. तसेच, त्यांची अतरवस्त्रे उतरवून ती उलटी परीधान करण्यासही सांगण्यात आल्याचा आरोप होतो आहे. सांगली येथील एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडल्याचे समजते. दरम्यान, ज्या कॉलेजवर हा प्रकार घडला त्या कॉलेजने कानावर हात ठेवले असून, नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांसोबत घडलेला प्रकार याच्याशी आपला काहीही संबंध नाही. आपण केवळ परीक्षेसाठी जागा उपलब्ध करुन दिली, असे कॉलेजने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, परीक्षार्थी उमेदवारांनी आपल्या पालकांकडे तक्रार केली. त्यानंतर पालकांनी हा प्रकार नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रारीच्या रुपात कानावर घातला. नीट परीक्षा सात मे रोजी देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये विविध केंद्रांवर पार पडली. या वेळी सांगली येथील विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची प्रथम तपासणी करण्यात आली. त्यांना कपडे उतरवून त्यांच्याकडे कॉपी आहे का हे पाहण्यात आले. तसेच, अंतरवर्स्त्रे उतरवून ती त्यांना उलटी परीधान करण्यास सांगितले.

घडल्या प्रकाराबद्दल विद्यार्थी, पालक आणि समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. विद्यार्थी-विद्यार्थीनिंची कपडे काडून तपासणी करत असताना सुरक्षा किती प्रमाणात बाळगण्यात आली होती. याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

NEET (UG) ही भारतातील सर्वात कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक आहे. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे दरवर्षी अंडरग्रेजुएट (MBBS/BDS/Ayush कोर्सेस) प्रवेशासाठी घेतली जाते. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, भारत आणि परदेशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी NEET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. भारतातील 542 वैद्यकीय, 313 दंत, 914 आयुष, आणि 47 BVSc आणि AH महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी एकच राष्ट्रीय स्तरावरील अंडरग्रेजुएट वैद्यकीय प्रवेश परीक्षा, NEET दरवर्षी घेतली जाते.