Jalgaon Municipal Corporation Election 2021 Result: जळगाव महापालिकेत शिवसेना विजयाचा 'सांगली पॅटर्न', भाजपची सत्ता गेली; गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याचे बुरुज ढासळले

महापैर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना 15 मतांनी विजयी झाल्या. जयश्री महाजन यांना 45 तर त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 35 मते मिळाली. कापसे यांचा 15 मतांनी पराभव झाला. तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे.

Shiv Sena | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जळगाव महापालिका ( Jalgaon Municipal Corporation) महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) आणि पर्यायाने महाविकासआघाडीने भाजपला जोरदार धोबीपछाड दिला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील संकट मोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या घरच्या मैदानावर भाजप चितपट (BJP Lost Power) झाला आहे. याला शिवसेनेतील नेत्यांची खेळी आणि एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने तयार झालेली राजकीय पोकळी अथवा वातावरण कारणीभूत ठरले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भाजपची कोंडी झाली. परिणामी महापौर, उममहापौर निवडणुकीत निकाल (Jalgaon Municipal Corporation Election 2021 Result) काय येणार हे स्पष्ट होते.

महापैर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना 15 मतांनी विजयी झाल्या. जयश्री महाजन यांना 45 तर त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 35 मते मिळाली. कापसे यांचा 15 मतांनी पराभव झाला. तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे.

एकूण 75 सदस्य संख्या असलेल्या जळगाव महापालिकेत भाजप 57, शिवसेना 15, एमआयएम 3 अशी सदस्य संख्या होती. त्यापैकी जवळपास 27 नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे भाजपला भगदाड पडले. भाजपला सत्ता वाचवणे दुरापस्त होऊन बसले. दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही शिवसेनेला सहकार्य केले. त्यामुले शिवसेनेचा विजय आणखीच सुखकर झाला. (हेही वाचा, Jalgaon Municipal Corporation Election 2021 Result: जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा, जयश्री महाजन महापौरपदी होणार विराजमान)

महापालिका निवडणुकीत या आधी भाजपने मिळवलेली सत्ताही फार पवित्र होती अशातला काही भाग नाही. भाजपनेही या आधी इतर पक्षातील नगरसेवक, नेते फोडूनच पक्ष वाढवला आहे आणि सत्ताही मिळवली आहे. यात भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचा हात आणि त्यांना मिळालेल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद मोठा होता. त्यामुळे इतर पक्षातून फोडून सत्ता मिळवलेल्या भाजपला असे कधीतरी आव्हान मिळणार हे नक्की होते. फक्त ते कधी आणि कोणाकडून हे पुढे आले नव्हते. (हेही वाचा, Jalgaon Municipal Corporation Mayor Election: जळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक, कोण मारणार बाजी? ऑनलाईन पद्धतीने होणरा मतदान; भाजपची प्रतिष्ठा पणाला)

शिवसेना खासदार विनायक राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम केला. ज्या पद्धतीने भाजपने इतर पक्षांचे नगरसेवक फोडले त्याच पद्धतीने भाजपचेही नगरसेवक फुटले. महत्त्वाचे म्हणजे जवळपास जवळपास 50% नगरसेवक फुटल्याने या नगरसेवकांना पक्षांतरबंदी कायदाही लावता आला नाही. भाजपची नेमकी गोची इथेच झाली. परिणामी भाजपला सत्ता गमवावी लागली.

दरम्यान, जळगावमधील भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपमध्येच गोची झाली होती. एकनाथ खडसे हे पहिल्या फळीचे नेते असताना दुसऱ्या फळीत असलेल्या गिरीश महाजन यांना भाजपने आणून पहिल्या पंगतीत बसवल्याने भाजपमधीलच एक गट मोठ्या प्रमाणावर नाराज होता. त्यात एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे नाराज भाजप गटाला बळ मिळाले. या सर्वांचा परिपाक भाजपची सत्ता जाण्यात झाला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now