Sangli Mayor's Cup Wrestling Viral Video: सांगली येथील महापौर चषक कुस्ती स्पर्धेत राडा, माऊली कोकाटे याने फोडले हमीद इराणी याचे डोके

दरम्यान, कुस्तीच्या जंगी फडासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मैदानात माऊली कोकाटे या मल्लाकडून काहीसे अखिलाडू वृत्तीचे दर्शन झाले. ज्यामुळे कुस्तीविश्वातून त्याच्यावर टीकेचा भडीमार होतो आहे.

Wrestling | (Archived, Edited Images)

सांगली येथील महापौर कुस्ती चषक (Sangli Mayor's Cup Wrestling Tournament 2023) स्पर्धे दरम्यान पुण्याचा मल्ल माऊली कोकाटे (Mauli Kokate) आणि इराणचा मल्ल हमीद इराणी (Hamid Irani) यांच्यात जोरदार सामना झाला. दरम्यान, कुस्तीच्या जंगी फडासाठी ओळखल्या जाणाऱ्या या मैदानात माऊली कोकाटे या मल्लाकडून काहीसे अखिलाडू वृत्तीचे दर्शन झाले. ज्यामुळे कुस्तीविश्वातून त्याच्यावर टीकेचा भडीमार होतो आहे. माऊली कोकाटे (: Mauli Kokate Vs Hamid Irani Viral Video) यांने कुस्ती सुरु असतानाच हमी इराणी या प्रतिस्पर्धी मल्लाच्या डोक्यावर प्रहार केले. ज्यामुळे त्याचे डोके फुटले आणि तो खाली कोसळला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महापौर चषक कुस्ती स्पर्धेसाठी माऊली कोकाटे आणि हमीद इराणी लंगोट आणि किस्ताक घालून मैदानात उतरले. दोघांनीही एकमेकांना सलामी दिली आणि कुस्ती सुरु झाली. पंचांसोबतच प्रेक्षकांचीही या कुस्तीवर बारीक नजर होती. दोन्ही पैलवान तुल्ल्यबळ असल्याने प्रेक्षकही हा सामना श्वास रोखून पाहात होतो. दोन्ही पैलवान चांगले तयारीचे. त्यामुळे माघार घ्यायला कोणीच तयार नव्हते. एकमेकांना ताकद आणि डाव दाखवणे कुस्तीच्या फडात सुरुच होते. जवळपास दीड तास हा निकराचा सामना सुरु होता. दोघेही कुस्ती जिंकायचीच यासाठी हट्टाला पेटले होते. दरम्यान, माऊली कोकाटे याने स्वत:वरचे नियंत्रण गमावले आणि त्याने प्रतिस्पर्धी मल्ल हमीद इराणी याच्या डोक्यावर पहिला ठोसा लगावला. कोकाटे हा इतक्यावरच थांबला नाही. तर त्याने पंचांनी हस्तक्षेप करेपर्यंत दुसरा टोला इराणीच्या डोक्याला लगावला. अचानक बसलेल्या या ठोशामुळे हमीद इराणी खाली कोसळला. (हेही वाचा, Nagraj Manjule Announcement: कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जीवनपट सिनेमाच्या भव्य पडद्यावर, नागराज मंजुळे यांची घोषणा)

व्हिडिओ

घडला प्रकार पाहून पंचांनी हस्तक्षेप केला. आयोजकही फडात आले. प्रेक्षकांनी बसल्या ठिकाणीच आरडाओरडा करत माऊली कोकाटे याच्यावर आक्षेप घेतला. दरम्यान, काही वेळात तणावपूर्ण बनलेले वातावरण निवळले. पंचांनी कुस्तीचा हा सामना बरोबरीत सुटल्याचे जाहीर केले. सांगलीच्या तांबड्या मातीतला महापौर चषक कुस्ती विश्वात नेहमीच कौतुकाचा आणि आदराचा विषय असतो. परंतू, कधी कधी काही घटना अशा काही घडतात की, ज्यामुळे संबंध स्पर्धेलाच गालबोट लागते. कोकाटे या मल्लाकडून घडलेला प्रकार काहीसा असाच असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif