सांगली मधील आटपाडीतील जनावरांच्या बाजारात तब्बल 1.50 कोटी रुपयांचा मोदी बकरा विक्रीस
देशभरासह राज्यातील कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून ठप्प झालेले व्यवहार आता सध्या हळूहळू सुरु होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सांगली मधील जनावारांचा बाजार ओळख असणाऱ्या आटपाडीत एक बकरा विक्री आणला होता. या बकऱ्याची किंमत हजर किंवा लाखो रुपये नव्हे तर कोटी रुपये होती. या बकऱ्याची किंमत ऐकताच सर्वजण थक्क झाले खरे पण त्याला विकत घेण्यासाठी एक व्यक्ती पुढे आला. पण त्याने तो बकरा लाखो रुपयांना खरेदी करतो असे म्हटले.(राजस्थान: Malaria, Dengue, COVID-19 नंतर Cobra च्या विषारी सर्पदंशावर मात करून पुन्हा कामाला सज्ज ब्रिटिश समाजसेवक)
आटपाडीतील आणलेला मोदी बकरा त्याची किंमत मालकाने तब्बस दीड कोटी रुपये लावली होती. या बाजारात एकाने या मोदी बकऱ्यासाठी 70 लाख रुपये देतो असे म्हटले. परंतु मालकाने ती रक्कम नाकारत आपण दीड कोटी रुपयांवरच ठाम असल्याचे म्हटले. तर कार्तिक पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र आणि कर्नाटकात आटपाडी यात्रा असते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात मालक आपल्या गुरुंना घेऊन येतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ती यात्रा रद्द करण्यात आली. पण जनावरांचा बाजार भरवण्यास रविवार आणि सोमवारी परवानगी दिली गेली. त्याचवेळी हा प्रकार घडला आहे.(Viral Video: आपल्या मालकाला संकटात पाहताच एका गायीने कमालच केली; पाहा संपूर्ण व्हिडिओ)
तसेच मोदी बकऱ्याच्या कोकरुची किंमत 13 लाख रुपये ठेवली गेली होती. सोमनाथ जाधव यांनी त्याची खरेदी 2 लाखांना केली होती. त्याचसोबत अन्य तीन मेंढ्यांची किंमत शेतकऱ्यांकडून 9 लाख रुपये सांगितली. तर जवळजवळ सात-आठ महिन्यांनी सुरु झालेल्या बाजारात जनावरांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2020 03:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

