Sangli Food Poisoning: आश्रमशाळेच्या सचिव, मुख्याध्यापकासह 5 जणांवर गुन्हा दाखल, चार जणांचे निलंबन
या प्रकरणात दोन मुख्याध्यापक तसेच दोन अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका आश्रम शाळेत मोठी दुर्घटना घडली होती. जत तालुक्यातील उमदी इथल्या एका आश्रम शाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता, आता या प्रकरणी कारवाई करण्यात आहे. विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी संस्थेचे सचिव, मुख्याध्यापकासह 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात दोन मुख्याध्यापक तसेच दोन अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान आश्रमशाळा चालवताना व्यवस्थापनाने गंभीर चूक केल्याने संस्थेची मान्यता रद्द का करु नये अशी कारणे दाखवा नोटीस व्यवस्थापनाला प्रशासनाने बजावली आहे. (हेही वाचा - Thane Crime News: ठाण्यातील शिवसेना शिंदे गटातील उपशाखा प्रमुखाचा खून, ३ जणांना घातल्या बेड्या)
सांगलीतील समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत मुरलीधर चाचरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार संस्थेचा सचिव श्रीशैल कल्लाप्पा होर्तीकर, मुख्याध्यापक सुभाषचंद्र महादेवाप्पा होर्ती, मुख्याध्यापक सुरेश चनगोंड बगली, अधीक्षक विकास तुकाराम पवार, अधिक्षिका अक्कमहादेवी सिध्धन्ना निवर्गी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.
उमदीमधील समता आश्रम शाळेतील दीडशे ते दोनशे मुलांना एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले जेवण आणि बासुंदी दिल्याची प्राथमिक माहिती आहे. मुलांनी हे जेवण खाल्ल्यानंतर उलट्या सुरू झाल्या अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.