Dasara Melava Accident News: दसरा मेळाव्यास निघालेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांच्या वाहनाचा सांगलीत अपघात; एक ठार, तीन जखमी

सांगलीतून निघालेल्या शिवसैनिकाच्या कारचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

car accident sanglai

Dasara Melava Accident News:  मुंबईत आज ठिकठिकाणी दसरा मेळावा साजरा केला जातो. दसरा मेळावासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचे नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानात होत आहे. तर राज्यातून ठिकठिकाण्याहून शिवसैनिकांनी दसरा मेळावासाठी हजेरी लावली आहे. दरम्यान सांगलीतून निघालेल्या शिवसैनिकाच्या कारचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. शुभ दिवशी गावकऱ्यांना  या दुर्घटनेचा सामना करावा लागला आहे.

मुंबईला सांगलीतून पहाटे निघालेल्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तीन जण जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिकी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळी ही घटना घडली. एक भर धाव ट्रकने यांच्या वाहनाला मागून धडक दिली, या भीषण धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या घटनेची माहिती नोंदवली आहे.

शिंदे गटाच्या युवा सेनेचे हे पदाधिकारी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती पोलीसांनी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात शोककळा पसरली आहे.

 



संबंधित बातम्या