Sangamner: धक्कादायक! भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली महिलेवर अत्याचार, एका मांत्रिकाला अटक
संगमनेर (Sangamner) येथील पारेगाव बुद्रूक (Paregaon Budruk) गावात भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना संगमनेर येथून एक संतापजनक माहिती समोर आली आहे. संगमनेर (Sangamner) येथील पारेगाव बुद्रूक (Paregaon Budruk) गावात भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक केली असून त्याच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. या घटनेनंतर आजुबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. समाजातील अशा अनिष्ठ गोष्टी बंद व्हाव्यात यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समिती कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही अनेकजण अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला गेल्या अनेक दिवसांपासून काही त्रास होत होते. परंतु, ही महिला डॉक्टरांकडे न जाता सावित्रा गडाख नावाच्या एका भोंदूबाबाकडे गेली. तिथे गेल्यानंतर या महिलेला भुतबाधा झाल्याचे भोंदूबाबाने सांगितले. तसेच तिच्या अंगातले भूत काढावे लागेल, असेही तो म्हणाला. भोंदूबाबाच्या थापांवर या महिलेने विश्वास ठेवला. त्यानंतर ही महिला तिच्या पतीसह भूतबाधा उतरवण्यासाठी भोंदूबाबाकडे गेली. त्यावेळी भोंदूबाबाने जबरदस्ती या महिलेला दारू पाजली आणि तिला शेतामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर संबंधित महिलेने संगरमेर पोलीस ठाणे गाठून भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे. हे देखील वाचा- Mumbra: धक्कादायक! मुंब्रा येथे शाररिक संबंधास नकार देणाऱ्या पत्नीची हत्या, पतीला अटक
'महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013' हा महाराष्ट्र राज्यातील एक गुन्हेगारी कायदा आहे. मुळात हा कायदा 2003 मध्ये जादूटोणाविरोधी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर (1945-2013) यांनी तयार केलेला आहे. हा कायदा जादूटोणा,नरबळी,आजार बरे करण्यासाठी काळ्या जादूचा वापर आणि अशाच प्रकारच्या अनेक कृती ज्यामुळे लोकांच्या अंधश्रद्धांचे शोषण होऊ शकेल त्यांना गुन्हेगारी अपराध ठरवितो.