उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलेल्या समित ठक्कर याला मुंबई हायकोर्टाकडून जामिन मंजूर

समित ठक्करने पर्यावरण आदित्य ठाकरे यांचा उल्लेख बेबी पेन्ग्विन असा केला होता. ट्विटर प्रचंड लोकप्रिय असलेल्या समितने मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना सतत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Uddhav Thackeray and Aditya Thackeray | ( Photo Credits: Twitter/Shiv Sena)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज्यमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या समित ठक्कर (Samit Thakkar) याला 24 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. मात्र आज 25,000 रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) हा निर्णय दिला आहे. समित ठक्करने पर्यावरण आदित्य ठाकरे यांचा उल्लेख बेबी पेन्ग्विन असा केला होता. ट्विटर प्रचंड लोकप्रिय असलेल्या समितने मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना सतत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आज हायकोर्टात झालेल्या सुनावणीत त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

समित ठक्कर हा नागपूरचा रहिवासी असून तो ट्विटरवर प्रचंड सक्रिय असतो. समितचे ट्विटरवर 60 हजार फॉलोवर आहेत. विशेष म्हणजे समितला चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते फॉलो करतात. हेदेखील वाचा- MNS on Maharashtra Government: मंत्रालयाचा नवा पत्ता शेअर करत मनसे नेते संदीप देशपांडे यांचा राज्य सरकारला टोला (View Tweet)

समित ठाकरे याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या काही नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात समित ठक्कर विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर या प्रकरणाने आणखीनच जोर धराल. यावेळी समितची अमृता फडणवीसांसह अनेकांनी पाठराखण देखील केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif