Sambhajinagar Crime: प्रेमसंबंधातून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या

या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar Crime: प्रेमसंबंधातून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या
Crime (PC- File Image)

प्रेमसंबंधावरून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर असे मयत महिलेचं नाव असून, तर आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर समावेश आहे.  (हेही वाचा -Pandharpur Crime: एकतर्फी प्रेमाने घेतला आणखी एक बळी, निर्घृणपणे केली हत्या, पंढरपूर हादरलं)

चंद्रकला बावस्कर यांचे प्रेमसंबंध असल्याचा तिच्या आई-वडील आणि भावांना संशय होता. दरम्यान, शनिवारी सकाळी शिवारात शमीम शाह कासम शाह हे शनिवारी आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी तिथे अचानक चंद्रकला बावस्कर धावत आल्या आणि आपल्या कुटुंबियांकडून लपवण्याची  विनवणी केली. त्यामुळे शमीम यांनी तिला त्यांच्या बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले. दरम्यान चंद्रकलाच्या भावांकडून शेडची पाहणी करण्यात आल्यानंतर त्यांना ती आढळली आणि त्यांने कुऱ्हाडीने चंद्रकला यांच्या डोक्यात घाव घातले. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी तिथे चंद्रकलाबाई यांचे आई वडिल देखील आले. त्यांनी शमीम याना मारहाण केली.

दरम्यान, शमीमने त्यांच्या तावडीतून आपली सुटकाकरुन घेत थेट पोलीस स्टेशन गाठले यामुळे  त्यांचा जीव वाचला. विशेष म्हणजे प्रेमसंबंधावरून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आहे. घटनेची माहिती मिळताच, फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.

(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2023 06:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).