Anganwadi Workers: खुशखबर! अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार; महिला बालकल्याण विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रश्न उचलून धरला.

Mangalprabhat Lodha (PC - ANI)

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा महिला बालकल्याण विकासमंत्री मंगलप्रभात लोढा (Women Child Welfare Development Minister Mangalprabhat Lodha) यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रश्न उचलून धरला.

तथापी, यावेळी महिला बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं की, मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती केली जाईल. तसेच अंगणवाडी सेविकांचा 20 टक्के पगार वाढ केली जाईल. याशिवाय अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी 150 कोटी खर्च केले जाणार आहेत. मनपा क्षेत्रात 200 कंटेनर अंगणवाड्या सुरू करण्यात येणार आहेत. अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार असल्याचंही लोढा यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - Nandurbar: कौतुकास्पद! अंगणवाडी सेविका Relu Vasave आदिवासी मुलं व गर्भवती स्त्रियांना पोषक आहार पुरवण्यासाठी दररोज 18 किमी बोट चालवून जातात दुर्गम भागात; पहा फोटो)

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. परंतु, आता शिंदे सरकारने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील एक लाख 10 हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून 20 हजार जागांची भरती केली जाणार आहे.