Saint Balumama: मनोहर मामा वादाच्या भोवऱ्यात, संत बाळूमामा यांच्या वारसाच्या चर्चेवर स्पष्टीकरण; उंदरगाव येथील Manohar Mama वादग्रस्त ठरण्याचे कारण काय?

त्यावरुन मनोहर मामा अधिकच वादाच्या भोवऱ्यात (Manohar Mama Controversy) अडकले. ज्यानंतर स्वत: मनोहर मामा नामक व्यक्तीने स्पष्टीकरण देऊन निर्माण झालेल्या चर्चा आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मुळात कोण आहेत मनोहरमामा?

Manohar Mama Controversy, Undargaon | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

संत बाळूमामा (Saint Balumama) यांचा वंशज, वारस अथवा अवतार असल्याच्या चर्चेवरुन उंदरगाव (Undargaon) येथील मनोहर मामा (Manohar Mama) चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत आदमापूर (Gram Panchayat Adamapur) येथे एक ठराव करुन पत्रक काढण्यात आले. त्यावरुन मनोहर मामा अधिकच वादाच्या भोवऱ्यात (Manohar Mama Controversy) अडकले. ज्यानंतर स्वत: मनोहर मामा नामक व्यक्तीने स्पष्टीकरण देऊन निर्माण झालेल्या चर्चा आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मुळात कोण आहेत मनोहरमामा? ते वादात येण्याचे आणि इतकी चर्चा होण्याचे नेमके कारण काय? मनोहर मामा याच्या प्रसिद्धीमागे दडलेली नेकमी स्टोरी काय? याबाबत घ्या जाणून.

ग्रामपंचायत आदमापूर ठराव

अदमापूर ग्रामपंचायतीने एक ठराव संमत केला. या ठरावात म्हटले होते की, संत बाळुमामा यांचे भक्त असलेले करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील भक्त हे बाळुमामा यांच्या नावाचा गैरवापर करतात. ते भक्तांकडून आर्थिक देणगी घेतात. आदमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय गुरव यांनी तसा आरोप केला आहे. ग्रामपंचायतीनेही तसा ठराव केल्याने वाद निरमाण झाला.

मनोहर मामा यांचे स्पष्टीकरण

आदमापूर ग्रामपंचायत ठरावावर मनोहरमामा यांनी प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट केली. मनोहरमामा यांनी म्हटले की, आपण संत बाळूमामा यांचे यांचे भक्त आणि उपासक आहोत. त्यामुळे आपण आपल्या शेतात बाळुमामा यांचे भव्य मंदिर बांधले आहे. या मंदिरात दर्शनासाठी राज्यभरातून लोक येतात. असे असले तरी माझा आणि आदमापूर येथील बाळूमामा मंदिर, अथवा संस्थांशी कोणताही संबंध नाही. बाळुमामा यांचे आडनाव हे आरभावे आहे. तसेच, माझे आडनाव हे भोसले आहे. या सर्व गोष्टी मला ज्ञात आहेत. त्यामुळे मी बाळुमामा यांचा वारस अधवा वंशज नाही, हेही मला ज्ञात आहे. मी बाळूमामा यांचा वंशज असल्याचा विधान अथवा दावा कोठेही केला नाही, असेही स्पष्टीकरण मनोहरमामा यांनी दिले आहे.

मनोहरमामा यांच्याविषयी थोडक्यात

दरम्यान, पत्रकार सचिन जवळकोटे यांनी लोकमत दैनिकाता मनोहरमामा यांच्यावर एक लेखच लिहिला आहे. या लेखात जवळकोटे यांनी मनोहरमामा यांचा सात-बाराच छापला आहे. या लेखानुसार, इंदारपूर तालुक्यातील ल्हासुर्णे गावातील मनोहर नावाचा एक व्यक्ती उंदरगाव येथे स्थायिक झाला. हा व्यक्ती म्हणजेच आजचा मनोहरमामा. हा व्यक्ती डीएड परिक्षेत नापास झाला आहे. त्यानंतर तो उंदरगाव येथून काही काळ गायब झाला. नंतर तो जो दाखल झाला थेट बाबा म्हणूनच. या व्यक्तीने म्हणे 'बंगाली विद्या' शिकली आहे. काही काळ या व्यक्तीने बुवाबाजी, भूत काढणे, करणी काढणे, असे उद्योग करुन पाहिले. परंतू, त्याला म्हणावे तसे यश आले नाही. उलट लोकांकडून 'प्रसाद'च अधिक मिळाला.

ट्विट

दरम्यान, अचानक साक्षात्कार झाला. मनोहरमामा हे संत बाळुमामा यांचाच अवतार असल्याची आवई उठली आणि भक्तांचा ओघ सुरु झाला. भक्तांचा सुरु झालेला ओघ हा आता वादाच्या वळणावर येऊन ठेपला आहे. ज्याचे पर्यावसण आता आदमापूर ग्रामपंचायतीने थेट ठराव करण्यात झाला आहे. या वादावर आता आता खुद्द मनोहर मामा यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता हा वाद शमतो की पुढे कायम राहतो, याबाबत उत्सुकता आहे.