Controversial Sacked IAS Puja Khedkar Case: बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ; पटियाला हाऊस कोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज
सुनावणीदरम्यान, पूजा खेडकर गैरहजर राहिल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. संपूर्ण सत्रात आरोपी एकदा हजर राहिल्यास तिला नेहमी हजर मानले जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. UPSC च्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने पूजा खेडकर विरुद्ध फसवणूक प्रकरणी एफआयआर नोंदवला होता.
Controversial Sacked IAS Puja Khedkar Case: नागरी सेवा परीक्षेत निवड होण्यासाठी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप असलेल्या बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर (Sacked IAS Puja Khedkar) यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टा (Patiala House Court) ने त्यांचा अटकपूर्व जामीन (Pre-Arrest Bail) अर्ज फेटाळला आहे. तसेच पतियाळा हाऊस कोर्टाने UPSC ला इतर कोणत्याही उमेदवाराने बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून आरक्षणाचा अन्यायकारक फायदा घेतला आहे का? याची चौकशी करण्यास सांगितले आहे. पूजा खेडकरला यूपीएससीमधील कोणी मदत केली आहे का? याचा तपास करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत.
दरम्यान, पूजा खेडकर यांच्या न्यायालयात हजर राहण्यावर कोर्टाने प्रश्न उपस्थित केले. सुनावणीदरम्यान, पूजा खेडकर गैरहजर राहिल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. संपूर्ण सत्रात आरोपी एकदा हजर राहिल्यास तिला नेहमी हजर मानले जाणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. UPSC च्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने पूजा खेडकर विरुद्ध फसवणूक प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता. (हेही वाचा - UPSC Cancels Puja Khedkar's Candidature: यूपीएससी कडून पूजा खेडकर वर मोठी कारवाई; IAS पद गेलं, भविष्यातही परीक्षा देण्यावर बंदी!)
महाराष्ट्र केडरच्या 2023 च्या बॅचमध्ये IAS अधिकारी म्हणून निवड झालेल्या खेडकर यांच्यावर UPSC परीक्षेत OBC आरक्षण मिळविण्यासाठी शारीरिक अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रासह खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यूपीएससीच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्याविरुद्ध फसवणूक, आयटी कायदा आणि अपंगत्व कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा -UPSC to Revamp Exam System: पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीचा मोठा निर्णय; परीक्षा पद्धतीत होणार अनेक मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर )
सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी युक्तिवाद केला की, या प्रकरणाचा तपास अत्यंत सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. प्रकरणाचा पुढील पाठपुरावा करण्यासाठी पूजा खेडकर यांची कोठडीत चौकशी आवश्यक आहे. प्रणालीची फसवणूक करणाऱ्या अशा प्रकारच्या व्यक्तींशी अत्यंत गांभीर्याने वागले पाहिजे. खेडकर यांनी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला आहे. (Trainee IAS Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांच्या पाथर्डी आणि मुंबईतील घरावर पुणे पोलिसांची छापेमारी, Manorama Khedkar आणि Dilip Khedkar यांचा शोध सुरू)
पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द -
तथापी, बुधवारी यूपीएससीने प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची तात्पुरती उमेदवारी रद्द केली. तसेच तिला भविष्यातील सर्व परीक्षापासून परावृत्त करण्याचा आदेश दिला. UPSC ने उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासल्या असून CSE-2022 नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पूजा खेडकर दोषी आढळली आहे, असं केंद्रीय लोकसेवा आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे.