Khwaja Yunus Custodial Death Case: सचिन वाझे याला व्हायचंय 'माफीचा साक्षीदार'; ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरण
हा अर्ज त्याने घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूस याच्या कथित कोठडी मृत्यू (Khwaja Yunus Custodial Death Case) प्रकरणी केला असून त्यात त्याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे.
अँटीलिया परिसरातील स्फोटके ठेवणे तसेच मनसूख हिरेन हत्या प्रकरणी सध्या कोठडीत असलेला आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) याने विशेष न्यायालयात सोमवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज त्याने घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूस याच्या कथित कोठडी मृत्यू (Khwaja Yunus Custodial Death Case) प्रकरणी केला असून त्यात त्याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. सचिन वाझे याला महाराष्ट्र पोलिस दलातून बडतर्फ करण्या आले आहे. न्यायालयापुढे दाखल केलेल्या अर्जात त्यानेक म्हटले आहे की, ख्वाजा युनूस प्रकरणात आपणास केव्हाही अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे आपणास माफईचा साक्षीदार होऊ देण्यास परवानगी देण्यात यावी.
'माफीचा साक्षीदार होऊ द्यावे'
सचिन वाझे याने न्यायालयापुढील अर्जात असेही म्हटले आहे की, या प्रकरणातील बरीच तथ्ये आपणास माहिती आहेत. दरम्यान, हे प्रकरण 20 वर्षांहूनही अधिक काळ सुरु आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणाचा आपणास नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. शिवाय, पोलिसांनी युनुसच्या मृतदेहाची ओळख पटविल्याचे किंवा या प्रकरणात आपला सहभाग असल्याचेही कोठे म्हटले नाही. त्यामुळे आपणास या प्रकरणात माफीचा साक्षीदार होऊ द्यावे. या प्रकरणाला होत असलेला कायदेशीर प्रलंब हा केवळ कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापरच नव्हे तर त्यासोबतच तो आपल्या समाजातील प्रतिमेलाही आणि उपजीविकेसही हानी पोहोचविणारा आहे. हा खटला पुन्हा नव्याने कधी सुरु होईल याबाबतही निश्चित काही सांगता याेत नाही. त्यामुळे तो निकाली निघण्यासही बराच कालावधी लागेल, असा दावा करत आपण माफीचा साक्षिदार होण्यास तयार असल्याचे वाझे याने म्हटले आहे. (हेही वाचा, Who is Sachin Vaze? अंबानी स्फोटक प्रकरणात चर्चेत आलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे नेमके कोण? वाचा सविस्तर)
सीआयडी चौकशीत वाझेचे नाव
सन डिसेंबर 2002 मध्ये घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी ख्वाजा युनूस या सॉफ्टवेअर इंजिनीअरला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याला पुढील तपासासाठी औरंगाबादला घेऊन जात असताना अहमदनगर जिल्ह्यात पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला तेव्हा तो पोलीस कोठडीतून पळाला होता, असा आरोप आहे. तेव्हापासून तो बेपत्ताच आहे. युनूस बेपत्ता झाल्यानंतर, गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) चौकशी सुरू केली आणि त्यानंतर युनूसचा कथितरित्या कोठडीत मृत्यू झाल्याचे पुढे आले. या प्रकरणात पुरावे नष्ट केल्याबद्दल वाझेसह 14 पोलिसांवर आरोप दाखल करण्यात आले. (Mukesh Ambani यांच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन यांची आत्महत्या; मुंब्रा येथील खाडीत सापडला मृतदेह)
दरम्यान, सरकारने केवळ चार अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यास मंजुरी दिली. सचिन वाझे, राजेंद्र तिवारी, राजाराम निकम आणि सुनील देसाई - जे सध्या खून, पुराव्याशी छेडछाड आणि कट रचल्याच्या आरोपाखाली खटल्याला सामोरे जात आहेत. दुसऱ्या बाजूला, सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले वाझे, सध्या अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भात अटकेत आहे, ज्यामुळे त्याच्या कायदेशीर अडचणीत आणखी एक गुंतागुंतीची भर पडली आहे.