Maharashtra Vidhan Sabha Voting 2024: सचिन तेंडुलकर, रितेश देशमुख, Farhan Akhtar, जॉन अब्राहम यांनी बजावला मतदानचा हक्क
जाणून घ्या आणखी कोणत्या सेलिब्रेटींनी केले मदतान.
विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) साठी आज (20 नोव्हेंबर) राज्यभारात मतदान पार पडत आहे. राज्यातील 288 मतदारसंघात मतदार आपले मतदानाचा हक्क बजावत आहेत. मुंबईमध्येही आपापल्या मतदारसंघांमध्ये दिग्गज व्यक्तिमत्वे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. आज सकाळीच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्यांची पत्नी जेनेलिया, फरहान खान (Farhan Akhtar) आणि जॉन अब्राहम (John Abraham) अशा काही मंडळींनी मतदान केले. या वेळी या सर्वांनीच वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलताना राज्यातील जनतेला जास्तीत जास्त मतदान करा. मतदान अमुल्य आहे. त्यामुळे आपण आपला हक्क बजावा, असे अवाहन केले.
सचिन तेंडुलकर यांची सहकुटुंब हजेरी
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हे आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर दाखल झाले. या वेळी त्यांच्यासोबत पत्नी अंजली आणि कन्या सारा तेंडुलकर या देखील उपस्थित होत्या. सचिन तेंडुलकर हे भारतीय निवडणूक आयोगाचे ब्रँड अबॅसडरही आहेत. त्यामुळे ते केव्हा मतदान करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, मतदान सुरु झाल्यानंतर सकाळच्या सत्रातच मतदान केले.
मास्टरब्लास्टरचे मतदारांना अवाहन
मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले, "मी गेल्या काही काळापासून ECI (भारतीय निवडणूक आयोग) चा आयकॉन आहे. मी जो संदेश देत आहे तो मतदान करणे आहे. ही आपली जबाबदारी आहे. मी सर्वांना विनंती करतो. बाहेर या आणि मतदान करा." (हेही वाचा, Maharashtra Assembly Election Voting: सुप्रिया सुळे, अजित पवार आणि युगेंद्र पवार यांसह बारामतीमध्ये दिग्गजांकडून मतदान; घ्या जाणून)
मतदारांना संदेश देताना ECI ब्रांड एंबेसडर
रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांनीही बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनेलिया यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आपले बंधू अमित देशमुख, धीरज देशमुख आणि काँग्रेस, महाविकासआघाडी उमेदवारांसाठी निवडणूक प्रचारात त्यांनी जोरदार मोहीम उघडली होती. मतदारांनी आपला अधिकार बजावावा. खास करुन जे पहिले मतदार आहेत त्यांना मी अवाहन करेन की, आपण सर्वजन पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. जेनेलिया यांनीही मतदान हा तुमचा अधिकार आहे, तो तुम्ही बजावायलाच हवा, असे अवानहन केले.
फरहान खान आणि जॉन अब्रहम यांनीही बजावला हक्क
अभिनेता फरहान खान आणि जॉन अब्राहम यांनीही विधानसभा निडवणूक 2024 साठी मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही अभिनेते स्वतंत्रपणे आले आणि त्यांनी आपला हक्क बजावला.
मतदान केल्यावर फरहान खान
अभिनेता जॉन अब्राहमनेही बजावला हक्क
चित्रपट दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी मुंबईतील वांद्रे येथील मतदान केंद्रावर, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान केल्यानंतर तिचे शाईचे बोट दाखवते.
राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान
महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक पार पडत आहे. त्यासाठी सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान सुरु असेल. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.