RTO अधिकाऱ्याकडे आढळली तब्बल 1 कोटी 71 रुपयांची बेहिशोबी संपत्ती

नागपूर (Nagpur) येथील प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याकडे तब्बल 1 कोटी 71 लाख बेहिशोबी संपत्ती सापडली आहे.

नागपूर (Nagpur) येथील प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याकडे तब्बल 1 कोटी 71 लाख बेहिशोबी संपत्ती सापडली आहे. संबंधित अधिकाऱ्याला गेल्या 3 वर्षापासून लाच घेतल्याप्रकरणी अटक मागच्या वर्षी अटक केली होती. त्यानंतर अधिकाऱ्याच्या उत्पन्नाचे स्रोत आणि त्यांच्याकडे असलेली संपत्ती यांचा तपास सुरु करण्यात आला. यामध्ये त्यांनी कमी कालावधीत पदाचा गैरवापर करून बेहिशोबी संपत्ती जमवल्याचे आढळून आले. यानंतर या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिथून डोंगरे असे नागपूर येथील आरटीओमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. मिथून डोंगरे हा गेल्या 3 वर्षांपासून नागपूर आरटीओत कार्यरत आहेत. दरम्यान, डोंगरे यांनी अनेकांकडून लाच घेत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाला कळाले. त्यानंतर नागपुरमध्ये कार्यरत असताना वाहन परवाना देण्यासाठी मिथुन डोंगरे यांनी दलाल मुकेश रामटेके यांच्या मदतीने दोन हजारांची लाच घेतली होती. या प्रकरणी दोघांविरोधात सीताबर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना 24 एप्रिल 2018 ला अटकही झाली होती. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली. यावेळी त्यांना 1 कोटी 71 लाख रुपयांची संपत्तीची कागदपत्रे सापडली. त्यानंतर मिथुन डोंगरे यांची चौकशी सुरू केली. यावेळी त्यांनी जिथे काम केले त्या विभागाकडूनही माहिती घेण्यात आली, अशी माहिती न्युज 18 लोकमत यांनी दिली. हे देखील वाचा-मुंबई मध्ये अडीच लाखांची लाच घेताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना सापळा रचून रंगेहात पकडले

नागपूर येथील आरटीओमध्ये 3 वर्षांपूर्वी नोकरीला लागलेल्या मिथुन डोंगरे यांचे याआधी शिकाऊ वाहन परवाना घोटाळ्यातही नाव आले होते. सप्टेंबरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने डोंगरे यांच्यासह 17 आरटीओ अधिकारी आणि दलाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.