MNS New Flag: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याला विरोध; आर आर पाटील फाऊंडेशनने लिहले पत्र

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा स्वीकार करत प्राधन्याने केशरी किंवा भगवा रंगाचा झेंडा स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे

MNS Flag (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) त्यांच्या बहुरंगी झेंड्यात बदल करणार असल्याचे वृत्त सर्वत्र झळकत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा स्वीकार करत प्राधन्याने केशरी किंवा भगवा रंगाचा झेंडा स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचे महाअधिवेशन पार पडणार आहे. या महाअधिवेशनात राज ठाकरे (Raj Thackeray) पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातच आरआर पाटील फाऊंडेशनने (RR Patil Foundation) मनसेच्या नव्या झेंड्याला विरोध दर्शवला आहे. शिवराजमुद्रेचा वापर मनसेच्या ध्वजासाठी करू नये, या आशयाचा पत्र आरआर पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील (Vinod Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहिले आहे.

गेल्या काही वर्षांपासून सतत पराभवाचे धक्के खात असलेली मनसे आता कात टाकणार आहे. याचाच एक भाग म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, मनसेच्या नव्या झेंड्याला विनोद पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. शिवराजमुद्रेचा वापर कोणत्याही एका पक्षासाठी करणे म्हणजे दुर्दैव असल्याचे विनोद पाटील यांनी म्हटले आहे. मनसेच्या नव्या झेंड्यावरून भविष्यात शिवप्रेमीमध्ये असंतोष निर्माण होईल, असेही या पत्रात म्हटले आहे. अद्याप राज ठाकरे यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. येत्या 23 जानेवारीला राज ठाकरे यांनी कोणता निर्णय घेतला आहे. हे सर्वांना कळणार आहे. हे देखील वाचा- MNS New Flag: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत भाजपसोबत युती करणार? पक्षाच्या नव्या झेंड्यावरुन राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 9 मार्च 2006 साली पक्षाची स्थापना केली होती. त्यावेळी मनसेने 2013 साली पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान, मनसेचे 13 आमदार निवडणून आले होते. परंतु, त्यानंतर पक्षाची घसरण सुरु झाली. यामुळे पक्षात नवा बदल घडवून आणण्यासाठी मनसे आपल्या विचारात आणि धोरणात बदल करणार का? असाही प्रश्न महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला पडला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif