बबड्याची सीरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर...,रोहित पवार यांचे आशिष शेलारांना प्रत्युत्तर
परीक्षाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. परंतु, परीक्षा घेण्यात येणारचं, असं न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी 'एका ‘बबड्या’च्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार...! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!', असं म्हणत सरकारवर निशाणा साधला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांनी शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार असल्याचा निकाल दिला. परीक्षाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. परंतु, परीक्षा घेण्यात येणारचं, असं न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी 'एका ‘बबड्या’च्या हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार...! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!', असं म्हणत सरकारवर निशाणा साधला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांनी शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, 'आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही, तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहिल. पण बबड्याची सीरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं. आता त्यासाठी किमान आपल्या tweet खालील रिप्लाय तरी वाचाल.' (हेही वाचा - UGC Final Year Examination: विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेण्यात येतील - उदय सामंत)
अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून आशिष शेलार यांनी यापूर्वी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, 'कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ज्ञांची मते घुडकावली, यूजीसीला जुमानलं नाही, मंत्रिमंडळात चर्चा केली नाही, विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरलं, अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले, यातून काय साध्य केलं?'
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर निकाल दिला. परीक्षा रद्द होऊ शकत नाही. परंतु, राज्य सरकार युजीसी (UGC) सोबत बोलून परीक्षांच्या तारखा पुढे ढकलू शकते, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.