Borivali Shocker: बोरिवली मध्ये शाळेत जात असलेल्या मुलीचा विनयभंग करणारा रिक्षाचालक अखेर 5 दिवसांनी पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी शाळेत जात असताना मध्येच रिक्षा थांबवत त्याने मुलीला स्पर्श केला. यानंतर पीडीत मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली आणि त्यानंतर मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक तिच्या दिशेने धावले.
मुंबई मध्ये बाल लैंगिक अत्याचारांच्या एकमागोमाग एक अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. बोरिवली (Borivali) मध्येही एका शाळकरी मुलीचा विनयभंग रिक्षाचालकाकडून झाल्याची घटना समोर आली होती. रिक्षा बंद पडल्याचं भासवून 15 वर्षीय मुलीचा शाळेत जात असताना विनयभंग झाला होता. घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीला पाच दिवसांनंतर बेड्या ठोकल्या आहेत. नालासोपारा भागातून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी रिक्षाचालकाचं नाव नरेश मोती सिंह आहे. तो 44 वर्षीय आहे. MHB पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला होता.
Maharashtra | In Mumbai's Borivali area, a rickshaw driver molested a 15-year-old girl going to school in a rickshaw, the driver fled from the spot when the girl protested. MHB police registered a case and started searching for the absconding accused and arrested him after 5 days…
— ANI (@ANI) September 6, 2024
. तेव्हा रिक्षाचालकांनी तेथून तो पर्यंत धूम ठोकली होती.
बदलापूर च्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन शिशू वर्गातील मुलींना शाळेतील सफाई कर्मचार्यांकडून लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पालकांकडून या शाळेची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर अशाप्रकारे बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना देखील समोर आल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2024 10:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

