Retired Navy Officer Beaten in Maharashtra: सीएम उद्धव ठाकरे यांचे कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण; शिवसेनेच्या कमलेश कदमसह चौघांना अटक (Watch Video)
महाराष्ट्रात 62 वर्षीय नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला (Retired Navy Officer) मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईत शिवसैनिकांनी शुक्रवारी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या घरात घुसून त्यावर हल्ला केला.
महाराष्ट्रात 62 वर्षीय नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला (Retired Navy Officer) मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईत शिवसैनिकांनी शुक्रवारी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या घरात घुसून त्यावर हल्ला केला. असे सांगण्यात आले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचे व्यंगचित्र (Cartoon) व्हॉट्सअॅपवर पाठवल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या 8-10 कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्याला मारहाण केली. सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणात शिवसेनेचे कमलेश कदम यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकारचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
एएनआय ट्वीट -
मुख्यमंत्र्यांचे कार्टून फॉरवर्ड केल्यानंतर शर्मा यांना अनेकवेळा कॉल करून घरातून खाली बोलावण्यात आले. जेव्हा ते खाली गेले तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांनी दावा केला आहे की, पोलीसही त्यांना पकडण्यासाठी आले होते. आता या प्रकरणात त्यांची मदत आमदार अतुल भातखळकर करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रिपब्लिक टीव्हीच्या वृत्तानुसार, या माजी अधिकाऱ्यावर सध्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाआघाडी सरकारच्या या वृत्तीमुळे संतप्त झालेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जावी असे म्हणणे आहे.
या प्रकरणासंदर्भात माजी अधिकाऱ्याच्या मुलीने मुंबईच्या समता नगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आहे. भादंवि अनुसार 325, 143, 147, 149 अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर गुंडांना संरक्षण दिल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणी ताबडतोब कारवाई करत चौघांना अटक केली आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अतिशय दुःखद असल्याचे ट्वीट केले आहे. ते म्हणतात, ‘एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना आहे. सेवानिवृत्त नेव्हीच्या अधिकाऱ्याने व्हाट्सएपवर संदेश पाठविल्यामुळे गुंडांनी त्यांना मारहाण केली. उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवा. आम्ही या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.’ (हेही वाचा: भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचा राज्य सरकारला इशारा '.. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा')
पहा व्हिडीओ -
तर अतुल भातखळकर म्हणतात, ‘अभिनेत्री कंगना रनौत यांच्या कार्यालयाची तोडफोड करून आपली मर्दानगी दाखवणाऱ्या सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने आता, नौदलाच्या एका वयोवृद्ध माजी अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली आहे. यामध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत केली आहे. मुख्यमंत्री घरी बसून हुकूमशाही चालवत आहेत. याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.’
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)