Reopening Schools In Maharashtra: महाराष्ट्रात दिवाळी नंतर शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल-अजित पवार
लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर शाळा आणि महाविद्यालये ही मार्च महिन्यापासून बंदच आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जाण्याचा मार्ग काढण्यात आला.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तर आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1480489 वर जाऊन पोहचला आहे. तसेच कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभुमीवर अनलॉकिंग 5 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच आता शाळा पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय दिवाळी नंतर घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर शाळा आणि महाविद्यालये ही मार्च महिन्यापासून बंदच आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जाण्याचा मार्ग काढण्यात आला.
पत्रकारांशी बोलताना पवार यांनी असे म्हटले की, दिवाळी संपेपर्यंत तरी शाळा पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार नाही. म्हणजेच शाळा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत अजून काही दिवस बंदच राहणार आहेत. पण दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेतील. त्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे पवार यांनी सांगितले. पुढे त्यांनी असे ही म्हटले की, काही राज्यांनी शाळा सुरु करण्याची घाई केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याच कारणास्तव त्यांना शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या आहेत. पण कोणत्या राज्यांनी शाळा सुरु केल्या किंवा बंद केल्या त्यांची नावे घेतली नाहीत.(Schools Reopening Guidelines Across India: येत्या 15 ऑक्टोंबर पासून देशात शाळा सुरु करण्यास परवानगी, 'या' अटीशर्थींचे पालन करावे लागणार)
दरम्यान, केंद्र सरकारने देशातील शाळा 15 ऑक्टोंबर पासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र शाळा सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांनी लेखी संमती पत्र लिहून देणे बंधनकारक असणार आहे. त्याचसोबत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यासह जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचना सुद्धा पाळणे गरजेचे असणार आहे. परंतु विविध राज्यातील सरकारने तेथील परिस्थिती पाहून शाळा पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.