93 वर्ष जुन्या असलेल्या लक्ष्मी विलास बँकला आर्थिक अनियमिततचे कारण देत RBI कडून निर्बंध

त्यानंतर आता दोन दिवसातच लक्ष्मी विलास बँकला आर्थिक अनियमिततचे कारण देत आरबीआय (RBI)कडून आर्थिक निर्बंध (PCA) लादण्यात आले आहेत.

आरबीआय (Photo Credits: PTI)

लक्ष्मी विलास बँकेच्या (Laxmi Vilas Bank) संचालकांच्या विरोधात दिल्लीत (Delhi) आर्थिक गुन्हे शाखेत नुकतीच तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर आता दोन दिवसातच लक्ष्मी विलास बँकला आर्थिक अनियमिततचे कारण देत आरबीआय (RBI)कडून आर्थिक निर्बंध (PCA) लादण्यात आले आहेत. या प्रकरणी आता लक्ष्मी विलास बँक अडचणीत सापडणार आहे. पीसीए अंतर्गत लक्ष्मी निवास बँकेला कर्ज देणे, नवी बँक शाखा खोलणे किंवा लाभांश जाहीर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

रॉयटर्स या वृत्तवाहिनीच्या मते, लक्ष्मी विलास बँकवर कथित फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तर रॅलिगेअर फिन्वेस्ट लिमिटेड यांच्याकडून हा आरोप लक्ष्मी विलास बँकवर लावला आहे. यामध्ये बँकेने RFL च्या 790 करोड रुपयांच्या एफडीमध्ये घोटाळा केल्याचे सांगण्यात येत आहे. तर दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

तर 1926 मध्ये लक्ष्मी विलास बँकची स्थापना करण्यात आली, त्यानंतर आरबीआयकडून 1958 मध्ये बँकेला त्याचा परवाना देण्यात आला. 1974 नंतर या बँकेचा विस्तार अधिक वाढत गेला. लक्ष्मी विलास बँक यांचे मुख्य फायनानशियल सेंटर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ यांच्यासह दिल्ली. मुंबई आणि कोलकाता येथे सुद्धा आहे.(PMC Bank Crisis नंतर काही कमर्शिअल बॅंका बंद होत असल्याच्या सोशल मीडियावरील बातम्या निव्वळ अफवा; RBI चे स्पष्टीकरण)

त्याचसोबत इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स यांच्या विरोधात ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या याचिकेत गृहवित्त कंपनीने कोट्यावधींचे कर्ज समूहाच्या संस्थापकांच्या मालकीच्या बनावट कंपन्यांना दिल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. तर काही दिवसांपूर्वी नुकताच आरबीआयकडून पंजाब अॅन्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (PMC) बँकेच्या काही सेवांवर पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत.