राष्ट्रीय स्वयंसेवक सघांचे सरसंघचालक मोहन भागवत नवीन संविधान बनवत असल्याची माहिती व्हायरल; संघाकडून पोलिसात तक्रार दाखल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) भारताचे नवीन सविधान (New Indian Constitution) बनवत असल्याची असल्याची एक पीडीएफ फाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोहन भागवत | (Photo Credits: IANS)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) भारताचे नवीन सविधान (New Indian Constitution) बनवत असल्याची असल्याची एक पीडीएफ फाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याविरोधात संघाकडून नागपूर (Nagpur) येथील कोतवाली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच सरसंचालक मोहन भागवत यांच्या नावाने चुकीची सोशल मीडियावर व्हायरल केली जात असून ती टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी संघाकडून करण्यात आली आहे.

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून राजकारण पेटलेले असाताना नवा वाद समोर आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत हे नवीन भारतीय संविधान बनवत असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. त्याची एक पीडीएफ फाईल बनवून व्हॉट्सऍपवर फिरवण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, पीडीएफ फाईलच्या मुख्यपृष्ठावर मोहन भागवत यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. हा खोटा प्रचार केला जात आहे. तसेच त्यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप संघाकडून केला जात आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि सांगली बंद; काय म्हणाले संभाजी भिडे, सुप्रिया सुळे

एएनआयचे ट्वीट-

मोहन भागवत गुरुवार 21 जानेवारीपासून चार दिवस नाशिक येथे जात आहेत. महाराष्ट्र , गुजरात आणि गोवा या पश्चिम क्षेत्रातील संघाच्या स्वयंसेवकांच्या बैठकांत मार्गदर्शन करतील