Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियक्ती; विधानसभा निवडणूक पार पडताच राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 पार पडताच राज्य सरकारने विरोधकांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियक्ती केली आहे.

Photo Credit- X

Rashmi Shukla: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 होत असल्यानं विरोधकांनी पोलीस महासंचालक (Maharashtra DGP)रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाकडं तक्रार केली. त्यामुळे निवडणूक आयोगानं बदलीचे आदेश मुख्य सचिवांना दिल्यानं रश्मी शुक्लांची()Rashmi Shukla) बदली करण्यात आली. आता मात्र राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर सरकारनं पुन्हा पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली आहे. (हेही वाचा:DGP Rashmi Shukla Transferred: राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; निवडणूक आयोगाचे आदेश)

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीनं दणदणीत विजय नोंदवला. महायुतीनं राज्यात विधानसभेच्या 288 पैकी 230 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगानं शनिवारी निकाल जाहीर केला. त्या निकालात भाजपानं 132 जागा जिंकल्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला 57 जागा मिळाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 41 जागा जिंकल्या.

मात्र निकालात महायुतीनं आघाडी घेतल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली. सरकारनं रश्मी शुक्ला यांना पुन्हा पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त केलं आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मोठा धक्का बसला. (Congress on Maharashtra Election Results: 'आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेला जनादेश स्वीकारतो, जनतेसाठी काम करत राहू'- कॉंग्रेस)

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा पक्षाला 20 जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसनं 16 जागावर यश मिळवलं. दुसरीकडं शरद पवार यांच्या पक्षाला फक्त 10 जागांवर समाधान मानावं लागलं. महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानं विरोधकांच्या गोटात सध्या स्मशान शांतता पसरली आहे.