Ramdas Kadam vs Gajanan Kirtikar: 'बायकोशी गद्दारी, पुण्यात खातात शेण'; रामदास कदम यांचा गजानन कीर्तीकर यांच्यावर व्यक्तीगत हल्ला

रामदास कदम (Ramdas Kadam) आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) अशी या दोन नेत्यांची नावे आहेत.

Ramdas Kadam vs Gajanan Kirtikar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवेसना पक्षात दोन ज्येष्ठ नेते एकमेकांचे येथेच्छ वस्त्रहरण करत आहेत. रामदास कदम (Ramdas Kadam) आणि ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) अशी या दोन नेत्यांची नावे आहेत. दोन्ही नेत्यांनी सामाज आणि राजकारणात टीका करताना पाळाव्या लागणाऱ्या सभ्यता खुंटीला अडकवल्या आहेत. एकमेकांचे खासगी आयुष्य जगासमोर आणत अत्यंत हीन भाषेत टीकाटिपण्णी सुरु केली आहे. गजनन कीर्तीकर यांनी आपल्या बायकोशी देखील गद्दारी केली. ते पुण्याला जाऊन शेण खातात अशा शब्दांमध्ये रामदास कदम यांनी टीका केली आहे. यावर कीर्तीकर यांच्याकडून काय प्रत्युत्तर येते आणि ते सभ्य भाषेत असेल काय? याबाबत उत्सुकता आहे.

वाद विकोपाला

रामदास कदम आणि कीर्तीकर यांच्यात पाठिागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. हा वाद गजानन कीर्तीकर सध्या ज्या लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत आहेत त्या मतदारसंघावरुन आहे. सुरुवातीला उमेदवारीवरुन सुरु झालेला वाद हा आता विकोपाला गेला आहे. कदम यांनी कालच कीर्तीकरांवर जोरदार निशाणासाधला होता. त्याला आता काही तासच उलटले नाहीत तोवर कदम यांनी त्यांच्यावर अत्यंत तीव्र आणि असभ्य भाषेत टीका केली आहे.

'महिला तुम्हाला चपलेने मारतील'

कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना कीर्तीकर यांना उद्देशून तीव्र शब्द वापरत म्हटले की, मी जर ठरवलं तर तुमंच वस्त्रहरण होईल. एकही महिला तुम्हाला मत देणार नाही. इतकेच नव्हे तर त्या तुम्हाला चपलेने मारतील. पुण्यामध्ये कीर्तीकर यांचे काय आहे ते जर सांगितलं तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा देखील उरणार नाही, असा इशाराच कदम यांनी दिला आहे.

रामदास कदम घेणार एकनाथ शिंदे यांची भेट

रामदास कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सायंकाळी 6 वाजता भेट होणार असल्याचे कदम यांनीच सांगितले आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांमधील वादात एकनाथ शिंदे काही तोडगा काढणार का? याबाबत उत्सुकता आहे. कदम असो की कीर्तीकर दोघांनीही एकमेकांवर गद्दारीचे आरोप केले आहेत. त्यामुळे एकमेकांवर आरोपांची राळ उडवत ऐन दिवाळीत शिमगा साजरा करणाऱ्या या दोन्ही नोत्यांना एकनाथ शिंदे काय सल्ला देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षातील फुटीनंतर खासदार गजानन कीर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात आहे. तर त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. अशा वेळी ठाकरे गटाने अमोल यांना लोकसभा तिकीट जाहीर केले आहे. दुसऱ्या बाजूला गजानन कीर्तीकर यांनी वयपरत्वे आपणास निवडणूक लढवायची नाही असे म्हटले आहे. दरम्यान, रामदास कदम हे कीर्तीकर यांच्या लोकसभा मतदारसंघातून आपले दुसरे पूत्र सिद्धेश कीर्तीकर यांच्यासाठी आग्रही आहेत. त्यावरुनच दोघांमध्ये जुंपली आहे.