IPL Auction 2025 Live

Ramdas Athawale Tested COVID-19 Positive: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

RPI नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

कोरोना व्हायरसची (Coronavirus) देशात आलेली लाट आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्रातही तिच परिस्थिती आहे. कोरोना बाधितांची रुग्णांची वाढती संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे जनतेच्या रक्षणासाठी घराबाहेर पडलेल्या राजकीय नेत्यांना (Politicians) मात्र कोरोना आपल्या जाळ्यात ओढत आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यापाठोपाठ आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळले. ही खबर ऐकतो न ऐकतो तोच आता RPI नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

रामदास आठवले हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. कारण कालच (26 ऑक्टोबर) अभिनेत्री पायल घोष यांनी रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आरपीआय पक्षात प्रवेश केला होता. मुंबईमध्ये रामदास आठवले आणि काही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. दरम्यान तिच्याकडे आता आरपीआय महिला आघाडीचं उपाध्यक्ष पद (vice president of women's wing of RPI) देण्यात आलं आहे. त्यात आज रामदास आठवले यांनाचा कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हेदेखील वाचा- Actor Payal Ghosh चा रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये आरपीआय (A) मध्ये प्रवेश; पक्षामध्ये महिला आघाडीचं उपाध्यक्ष पद सांंभाळणार

दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असेही सांगण्यात येत आहे.

याआधी राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.