Ramdas Athawale Poem: देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रामदास आठवले यांना मुख्यमंत्री पदाची आठवण

हा सत्तासंघर्ष मुख्यमंत्री पदावरुन होता. याच काळाची आठवण करुन देत मी सांगितलेला तोडगा स्वीकारला असता तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते, असे रामदास आठवले यांनी म्हटले.

Ramdas Athawale | (Photo Credit : Facebook)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास मिष्कील शैलीत भाष्य करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची आठवण करुन दिली आहे. विधानसभा निवडणूक 2019 नंतर शिवसेन आणि भाजप यांच्यात जोरदार सत्तासंघर्ष झाला. हा सत्तासंघर्ष मुख्यमंत्री पदावरुन होता. याच काळाची आठवण करुन देत मी सांगितलेला तोडगा स्वीकारला असता तर देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते, असे रामदास आठवले यांनी म्हटले. ‘सन्मान देवदूतांचा’ (Sanmaan Devdoot) हा एक विशेष कार्यक्रम आज (4 जुलै) मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होे. या कार्यक्रमास आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) उपस्थित होते.

रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात म्हटले की, शिवसेना आणि भाजप या दोघांनी मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यावं, असा तोडगा स्वीकारला होता. तसेच, तुमचं मिटत नसेल तर थेट मलाच मुख्यमंत्री करा असाही तोडगा मी सूचवला होता, अशी मिष्कील आठवण रामदास आठवले यांनी सांगीतली. रामदास आठवले यांची आठवण ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (हेही वाचा, Remdesivir: दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे? ​नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले यांच्यावर काँग्रेसचा निशाण)

दरम्यान, रामदास आठवले यांनी याच कार्यक्रमात आपल्या नेहमीच्या स्टाईलने एक खास कवीताही उपस्थितांना ऐकवली. ही कविता ऐकून उपस्थितांचीही चांगलीच करमणूक झाली.

रामदास आठवले कविता

आठवलेंच्या कवितेने उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे

तुम्ही आणि मी सुद्धा आहे कोरोना योद्धा,

वंदन करतो शिवाजी महाराज आणि गौतम बुद्धा…

जसं बॅंकेत असतं आपलं खातं,

तसं नसतं माणुसकीचं नातं….

कोरोनाने साऱ्या जगाला नाचवले,

पण डॉक्टरने लाखो लोकांना वाचवले…

अनेक पेशेंटना हॉस्पिटलला पाठवले,

आणि मी आहे रामदास आठवले…

मी दिला होता गो कोरोना गो चा नारा,

कोरोनाला गो म्हणता म्हणता कोरोना माझ्या पाठी लागला…!

रामदास आठवले यांनी या वेळी राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरस संकट काळात केलेल्या कामाचे तोंडभरुन कौतुक केले. कोरोना व्हायरस महामारीत राजेश टोपे यांनी केलेले काम उल्लेखनिय आहे. या स्थितीत काम करणे खरोखरच आव्हानात्मक होते. परंतू, टोपे यांनी उत्तम काम केले.