Ramdas Athawale: महाराष्ट्रातील सर्व मंदिरांसह धार्मिक स्थळे उघडण्याच्या निर्णयावरुन रामदास आठवले यांची राज्य सरकारवर टीका
या निर्णयावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले आहे. या निर्णयावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. तरीही या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी रिपाइं ने राज्यभर आंदोलन केले होते, असे रामदास आठवले म्हणाले आहेत
महाराष्ट्रातील मंदिर खुली करावी, यासाठी भाजपने विविध ठिकाणी आंदोलने केली होती. याचदरम्यान, भाजपाने सिद्धिविनायक मंदिरातही आंदोलन केले होते. केवळ भाजपच नव्हेतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर आंदोलन केले होते. दरम्यान, मनसेनेही महाराष्ट्रातील मंदिरे लवकरात लवकर उघडा अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. याशिवाय, एमआयएमनेही प्राथर्नास्थळे आणि मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन पुकारले होते. हे देखील वाचा- Mumbai's Siddhivinayak Temple: उद्यापासून उघडणार मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर; दिवसाला फक्त 1000 भक्तांनाच परवानगी, अॅपद्वारे करावे लागेल दर्शनाचे बुकिंग
महाराष्ट्रातील सर्वच प्राथना स्थळे बंद असताना राज्यातील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी पांढऱ्या कपड्यातील देव भक्तांची काळजी वाहत होते. परंतु, पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरांसह प्राथनास्थळे उघडण्याचा राज्य सरकारने निर्णय घतेला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे, प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.