Dahi Handi 2020: राम कदम आयोजित घाटकोपर मधील प्रसिद्ध दहीहंडी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द, पहा ट्विट
मुंबईमधील मानाची आणि चर्चेतील मानली जाणारी घाटकोपरची (Ghatkopar) राम कदम (Ram Kadam) आयोजित दहीहंडी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. याबाबत स्वतः कदम यांनी ट्विट करून माहिती दिली.
कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर मागील अडीच महिन्यात कोणताही मोठा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेला नाही, आताची परिस्थिती पाहता येत्या काळातही हे कार्यक्रम करण्यास परवानगी मिळेल अशी शक्यता कमीच आहे. गणेशोत्सवासारखा (Ganeshotsav) मोठा सण यंदा अगदी परंपरेपुरताच साजरा करण्याचा निर्णय आल्यानंतर आता ठिकठिकांणी दहीहंडी (Dahihandi) सुद्धा रद्द करण्याचे निर्णय घेतले जात आहेत. मुंबईमधील मानाची आणि चर्चेतील मानली जाणारी घाटकोपरची (Ghatkopar) राम कदम (Ram Kadam) आयोजित दहीहंडी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. याबाबत स्वतः कदम यांनी ट्विट करून माहिती दिली. Ganeshotsav 2020: गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना गणेश मंडळांना मान्य
दहीहंडीमुळे होणारी गर्दी यंदा जनहिताच्या दृष्टीने घातक ठरू शकते. त्यामुळेच यंदाची दहीहंडी रद्द करत आहोत असे राम कदम यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे. यंदा 12 ऑगस्ट रोजी दहीहंडी आहे, अद्याप अन्य मोठ्या मंडळांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी यंदा सेलिब्रेशन होणार नाही हे जवळपास निश्चित आहे.
राम कदम ट्विट
दरवर्षी साधारणपणे श्रावणात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात अनेक सण येत असल्याने सर्वत्र धामधूम असते यंदा मात्र हे सण साजरे न करण्याच्या घोषणा होत असल्याने उत्साह मावळलेला दिसत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)