Raksha Bandhan 2024: पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, आदीती तटकरेंनी बांधली धनंजय मुंडे यांना राखी (Watch Video)

या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे आणि आदिती तटकरे धनंजय मुंडे यांना राखी बांधताना दिसत आहेत.

Pankaja Munde tied rakhi to Dhananjay Munde (फोटो सौजन्य - X)

Raksha Bandhan 2024: रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) हा भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणणारा सण आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी मुंडे कुटुंबियांमध्ये राजकीय वातावरणामुळे बहिण-भावांमधील संबंध ताणले गेले होते. मात्र, आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र आल्याने हे संबंध पूर्ववत होताना दिसत आहेत. यंदा रक्षाबंधनानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) आणि यशश्री मुंडे (Yashashri Munde) यांनी आपला चुलत भाऊ धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राखी बांधली.

यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदीती तटकरे यांनी देखील धनंजय मुंडे यांना राखी बांधली. या आनंदी क्षणाचा व्हिडिओ धनंजय मुंडे यांनी आपल्या एक्स हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे आणि आदिती तटकरे धनंजय मुंडे यांना राखी बांधताना दिसत आहेत. (हेही वाचा - PM Modi Celebrates Raksha Bandhan: दिल्लीत शालेय विद्यार्थीनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधली खास राखी; आईसोबतच्या फोटोंचा समावेश (See Pics and Video))

पहा व्हडिओ -

दरम्यान, आज रक्षाबंधनानिमित्त कोलकाता बलात्कार-हत्येच्या घटनेचा निषेध करणाऱ्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) च्या डॉक्टरांनी सरकारी अधिकारी, महाविद्यालयीन प्रशासक, पोलीस, सुरक्षा कर्मचारी, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांना राख्या बांधल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif