Rajgurunagar Video: आईच्या कुशीत दुचाकीवर बसलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू
पुणे (Pune Accident News) जिल्ह्यातील राजगुरुनगर (Rajgurunagar) येथील एका धक्कादायक घटनेमुळे एका सहा महिन्याच्या चिमुकलीच्या (Six Month Baby) न पाहिलेल्या स्वप्नांच्या फुलण्याआधीच ठिकऱ्या उडाल्या. बेमुर्वतखोर ठेकेदार, बेजबादार प्रशासन आणि कोणतेही गांभीर्य नसलेली जनता आणि मतदार यांच्या निष्क्रियतेमुळे चुमुकलीचे आयुष्य ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडले गेले.
पुणे (Pune Accident News) जिल्ह्यातील राजगुरुनगर (Rajgurunagar) येथील एका धक्कादायक घटनेमुळे एका सहा महिन्याच्या चिमुकलीच्या (Six Month Baby) न पाहिलेल्या स्वप्नांच्या फुलण्याआधीच ठिकऱ्या उडाल्या. बेमुर्वतखोर ठेकेदार, बेजबादार प्रशासन आणि कोणतेही गांभीर्य नसलेली जनता आणि मतदार यांच्या निष्क्रियतेमुळे चुमुकलीचे आयुष्य ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडले गेले. होय, राजगुरुनगर परिसरातील एका रस्त्यावर ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने सहा महिन्याच्या मुलीचा जागीच चिरडून मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे ही चिमुकली आपल्या आईच्या कुशीत बसून वडिलांसोबत दुचाकीवर निघाली होती तेव्हा ही घटना घडली. दरम्यान, व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला विचलीत करु शकतात.
राजगुरुनगर येथील वाडा रस्त्यावर एका कापड दुकानासमोर भर दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. बाळाचे वडील दुचाकी चालवत होते. दुचाकीच्या सीटवर पाठिमागे बाळाची आई सहा महिन्याच्या तान्ह्या बाळाला घेऊन बसली होती. हे दाम्पत्य दुचाकीवरुन निघाले होते. रस्त्यांवरील खड्डे आणि गर्दी यांतून मार्ग काढत दुचाकी पुढे निघाली होती. दरम्यान, पाठिमागून आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला धक्का दिला. त्यात तान्ही चिमुकली आईच्या हातून कुशीतून निसटली आणि खाली पडली. इतक्यात पाठिमागून ट्रॅक्टर आला आणि ती चाकाखाली चिरडली गेली. उपस्थितांपैकी सर्वांच्याच डोळ्यासमोर ही घटना घडली. (हेही वाचा, Lpg Tanker Accident: रत्नागिरीतील लांजा येथे Bharat Petroleum एलपीजी टॅकर उलटला; Mumbai Goa Highway वाहतूक विस्कळीत)
सहा महिन्यांच्या मृत चिमुकलीचे वडील कैलास चिंतामणी आढळ (Kailas Chintamani Aadhal) यांनी ट्रॅक्टर चालकाविरोधात स्थानिक पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर हा विशाल भांबुरे (Vishal Bhambure) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशाल भांबुरे हा खेड तालुक्यातील भांबुरवाडी येथील राहणारा आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरु केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव यांनी या प्रकारानंतर दिली.
व्हिडिओ
दरम्यान, रस्तेवाहतूक आणि नागरिकांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राजगुरुनगर परिसरात फेरीवाले, दुकानदार यांनी फुटपात आडवले आहेत. तसेच, अनेक वाहन चालक, मालक आणि व्यापारी हे त्यांची छोटीमोटी वाहने रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे आगोदरच कमी असलेला रस्ता अधिकच अरुंद होतो. याशिवाय दुचाकी आणि पादचारी यांना रस्त्यावरुन जाण्यासाठी मोठ्या वाहनांतूनच मार्क काढावा लागतो असे स्थानिक सांगतात. राजगुरुनगर येथे घडलेल्या घटनेत चिमुकलीचा काहीच दोष नव्हता. तिचे जीवन हाकनाक वाया गेले, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)