Raj Thackeray Visit BDD Chawl: राज ठाकरे यांची बीडीडी चाळीला भेट, पुतण्याच्या मतदारसंघावर काकाचा डोळा?

या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Raj Thackeray Meets Maratha Reservation Protestors (PC - Twitter/ANI)

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी विधानसभा मदतारसंघात येणाऱ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक भेट दिली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. राज यांनी चाळीतील पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी मनसे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या भेटीनंतर पुतण्याच्या मतदारसंघावर काकाच्या पक्षाचा डोळा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बीडीडी चाळीचा (BDD Chawl) पुनर्विकास राज्य सरकारच्या वतीने केला जात आहे. या प्रकल्पादरम्यान स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या जात आहे. प्रामुख्याने व्यापाऱ्यांच्या काही समस्या आहेत. ज्या घेऊन ते राज ठाकरे यांच्याकडे गेले होते. परिणामी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बीडीडी शाळेतील रहिवाशांची आणि व्यापाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यानंतर त्यांनी परिसरातील कामांचीही पाणही केली. प्रामुख्याने वरळी बीडीडी, नायगाव बीडीडी आणि ना. म. जोशी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्याचा एक मोठा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. ज्याकडे शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर लक्ष लागले आहे.

बीडीडी चाळ येत असलेला वरळी या विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (UBT) गटाचे नेते आणि युवा आमदार आदित्य ठाकरे प्रतिनिधीत्व करतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा थेट वारसा लाभलेल्या कुटुंबातून सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच एका ठाकरेंनी निवडणूक लढवली. ज्याची राज्यभर आणि देशभरही चर्चा झाली. या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे आमदार सुनील शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना पक्षात आलेल्या सचिन अहीर यांना विधानपरिषदेवर पाठविल्यानंतर आदित्य यांच्यासाठी हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या सुरक्षीत झाला. या ठिकाणाहून आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले. तेव्हापासून आदित्य यांचे या मतदारसंघात बारीक लक्ष असते.

BDD म्हणजे मुंबई विकास विभाग. ब्रिटीश सरकारने 1920 मध्ये पुनर्हक्क केलेल्या जमिनींवर 50,000 सदनिका बांधण्यासाठी BDD ची स्थापना केली. बीडीडी चाळी 1920 ते 1925 दरम्यान बांधल्या गेल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif