Raj Thackeray on Toll Plaza Issue: राज्याच्या एन्ट्री पॉइंटवर राज्य सरकार आणि मनसे कॅमेऱ्यांची नजर- राज ठाकरे

राज्याचे मंत्री दादा भूसे यांच्यासोबत टोलच्या मुद्द्यावरुन आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Raj Thackeray | (Photo Credit - X)

Raj Thackeray, Dada Bhuse Press Conference: महाराष्ट्रातील सर्व एन्ट्री पॉइंटवर राज्य सरकारतर्फे कॅमेरे लावले जातील. त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचे कॅमेरेही असतील. हे कॅमेरे टोलनाक्यांवरुन (Toll Plaza Issue) किती वाहने जातात याची नोंद ठेवतील. इतकेच नव्हे तर सदर महामार्ग, रस्त्याची उभारणी करण्यासाठी एकूण किती कोटींचे टेंडर निघाले होते. त्या टेंडरमधील किती पैसे टोलनाक्यावरुन वसूल केल्या जाणाऱ्या कररुपात किती पैसे कंपनीला मिळाली. तसेच, टेंडरमधील किती पैसे बाकी आहेत. किती दिसवांमध्ये रस्ता नागरिकांसाठी खुला होईल, यासंदर्भातील सर्व माहिती एका डिजीटल बोर्डच्या माध्यमातून टोलच्या दोन्ही बाजूला लावले जातील, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. राज्याचे मंत्री दादा भूसे यांच्यासोबत टोलच्या मुद्द्यावरुन आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान अनेक मुद्दे मांडले आणि राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेची माहितीही दिली. त्यातील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे-

एक्स पोस्ट

राज ठाकरे यांच्यासोबत टोल नाक्यांवरुन झालेल्या चर्चेमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यातील मुद्द्यांवर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर बदल करुन सोडवणू केली जाईल, अशी माहिती दादा भूसे यांनी दिली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावर दादा भूसे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणीस यांच्याकडून चुकून ते विधान झाले असावे. त्यांची भूमिका वेगळी होती. मात्र, प्रसारमाध्यमांनी तेवढाच मुद्दा उचलून धरला अशा आशयाचे वक्तव्य भूसे यांनी केले. तसेच, टोल नाक्यावर जे कर्मचारी बसतात त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल. तसेच, नागरिकांशी सौजन्याने वर्तन करावे अशा सूचना टोल चालकांना दिल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.