राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाला साथ द्यायला नको - नितिन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले आहे.त्यावेळी गडकरी यांनी मैत्री असणाऱ्या व्यक्तींपासून कधी दूर जात नसल्याचे म्हटले आहे. तर भाजप (BJP) आणि शिवसेनेने (Shiv Sena) केलेली ही युती हिंदूत्वाच्या आधारावर आहे.
मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा राजकरणाकडे पाहणारा दृष्टीकोन वेगळा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे विचार जवळजवळ समान असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. परंतु राज ठाकरे यांनी युती करण्यापूर्वी विचार करावा. मात्र राष्ट्रवादी पक्षाल साथ देऊ नये असे ही नितिन गडकरी यावेळी म्हणाले.(हेही वाचा-Lok Sabha Election 2019: पार्थ पवार, डॉ अमोल कोल्हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, राष्ट्रवादी कॉंग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर)
तर पुढे मुलाखतीत गडकरी यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत असे म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करण्यापूर्वी त्यांच्या प्रतिष्ठेचा मान राखला पाहिजे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उत्तम राज्य कारभार करत असल्याचे ही नितिन गडकरी यांनी वक्तव्य केले आहे.