ऑडीओ क्लिपद्वारे राज ठाकरे यांचे मतदारांना आवाहन; 'गाफील राहू नका, स्वतःची ताकद ओळखा आणि निर्णय घ्या' (Listen Audio Clip)
लोकसभेच्या निकालानंतर राज्यात सर्वच पक्षांनी सत्तेत येण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे (MNS) पक्षही मोठ्या ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.
Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वार वाहत आहे. लोकसभेच्या निकालानंतर राज्यात सर्वच पक्षांनी सत्तेत येण्यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे (MNS) पक्षही मोठ्या ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मतदानाला काही दिवस राहिले असताना, निवडणुकीला जाण्यापूर्वी स्वतःची ताकद ओळखा आणि निर्णय घ्या अशा शब्दांत राज ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी सोशल मिडीयावरवर एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली आहे ज्याद्वारे जनतेने गाफील राहू नये असा संदेश त्यांनी दिला आहे.
ऐका राज ठाकरे यांची ऑडिओ क्लिप -
दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी जवळ जवळ प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार उतरवून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना आव्हान निर्माण केले आहे. प्रचारासाठी राज ठाकरे यांनी स्वतः सभांचा दौरा सुरु केला आहे. तसेच मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी अशा प्रकारे सोशल मिडीयाचाची आधार घेतला जात आहे. सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.